अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड 'असे' येतात उपयोगी

अडचणीच्या काळात म्युच्युअल फंड 'असे' येतात उपयोगी

Mutual Fund - अडचणींच्या काळात फंडाचा कसा उपयोग करायचा ते घ्या जाणून

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : तुम्हाला अचानक अडचणींना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी तुमच्याकडे 4 ते 5 इमर्जन्सी फंड्स हवेत. त्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करता येते. त्यासाठीच काही म्युच्युअल फंड्स उपयोगी येतात. त्याबद्दलच जाणून घेऊ या. यात 7 टक्क्यांप्रमाणे रिटर्नस मिळतात.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत. एक SIP आणि दुसरा एक रकमी गुंतवणूक. शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं. पण हे फंड कसे निवडायचे? कुठले फंड चांगले असतात?

लवकरच महागणार ट्रेनचा प्रवास, IRCTC लावणार हा दर

डेट फंड्स  - डेट फंडसारखे म्युच्युअल फंड आहेत, जे गुंतवणूकदारांचे पैसे डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये  लावतात. इंस्ट्रुमेंट्स म्हणजे काॅल मनी, बाॅण्ड, डिबेंचर्स, सरकारी सिक्युरिटीज, डिपाॅझिट सर्टिफिकेट आणि कमर्शियल पेपर. वेगवेगळ्या आर्थिक लक्ष्याप्रमाणे डेट फंड असतात.

डेट फंड  - डेट फंड अनेक प्रकारचे असतात.लिक्विड फंड, अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंड, शाॅर्ट टर्म फंड, गिल्ट फंड, इन्कम फंड, क्रेडिट ऑप्युर्चनिटी फंड, मंथली इन्कम प्लॅन आणि फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन.

घर खरेदी करताय? मग म्युच्युअल फंडाची 'अशी' घ्या मदत आणि राहा टेंशन फ्री

लिक्विड फंड्स - कमी काळासाठी गुंतवणूक करणारे फंड लिक्विड मानले जातात. लिक्विड फंडाला मनी मार्केट फंडही म्हटलं जातं. लिक्विड फंडात काही दिवसांपासून काही आठवडे गुंतवणूक करणं शक्य असतं. जास्त पैसे मिळाले तर या फंडात टाकले जातात. या फंडांना एक्झिट लोड लागत नाही.

लिक्विड फंडातून रक्कम त्वरित बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होते. या फंडात तुम्ही थोड्या दिवसांकरता गुंतवणूक करू शकता. यातली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

पेट्रोलच्या दरात बदल नाही, डिझेल आणखी स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंड्स  - अल्ट्रा शाॅर्ट फंडात काही आठवड्यांपासून तीन महिन्यांपर्यंत गुंतवणूक शक्य असते. लिक्विड फंडाच्या तुलनेत अल्ट्रा शाॅर्ट टर्म फंडात धोका जास्त असतो. पण दुसऱ्या लाँग टर्म फंडाच्या तुलनेत इथे धोका कमी असतो आणि एफडीपेक्षा जास्त रिटर्न मिळतात.

अलमट्टी धरणात मिळताना कृष्णेचं रौद्ररूप, पाहा हा ड्रोन VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 06:13 PM IST

ताज्या बातम्या