मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mutual Fund : म्युच्युअल फंडाचा परतावा मुदतठेवीप्रमाणे निश्चित का नसतो?

Mutual Fund : म्युच्युअल फंडाचा परतावा मुदतठेवीप्रमाणे निश्चित का नसतो?

 म्युच्युअल फंड शेअर बाजाराशी (Share Market) निगडित असल्यानं तसंच अन्य काही बाबीही त्याचा परतावा ठरवण्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांचा परतावा चांगला असला तरी तो बँकेतील मुदत ठेवीप्रमाणे निश्चित नसतो.

म्युच्युअल फंड शेअर बाजाराशी (Share Market) निगडित असल्यानं तसंच अन्य काही बाबीही त्याचा परतावा ठरवण्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांचा परतावा चांगला असला तरी तो बँकेतील मुदत ठेवीप्रमाणे निश्चित नसतो.

म्युच्युअल फंड शेअर बाजाराशी (Share Market) निगडित असल्यानं तसंच अन्य काही बाबीही त्याचा परतावा ठरवण्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांचा परतावा चांगला असला तरी तो बँकेतील मुदत ठेवीप्रमाणे निश्चित नसतो.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 नोव्हेंबर :  गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये पोस्टातील अल्पबचत योजना (Post Office Scheme) आणि बँकेतील मुदत ठेवी (Bank Fixed Deposit) हे प्राधान्याचे पर्याय आहेत. मात्र बँकांमधील मुदत ठेवीचे व्याजदर (Interest rates) कमी होत असल्यानं तसंच त्यापेक्षा अधिक परतावा (Returns) म्युच्युअल फंडातून (Mutual Fund)मिळत असल्यानं आता मोठ्या प्रमाणात लोक मुच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. गेल्या काही वर्षात तर हे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परतावा चांगला मिळण्याबरोबरच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही सुरक्षित असल्यानं लोकांचा याकडे ओढा वाढला आहे. म्युच्युअल फंड शेअर बाजाराशी (Share Market) निगडित असल्यानं तसंच अन्य काही बाबीही त्याचा परतावा ठरवण्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे म्युच्युअल फंड योजनांचा परतावा चांगला असला तरी तो बँकेतील मुदत ठेवीप्रमाणे निश्चित नसतो. त्याबाबत माहिती देणारा हा लेख.

सर्वसामान्य गुंतवणूकदार (Investor) जेव्हा गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या पर्यायांची निवड करत असतो तेव्हा त्याचं प्राधान्य सुरक्षिततेला (Security) अधिक असतं. आपण कष्टाने कमवलेला पैसा बुडू नये अशी त्याची इच्छा असते. बऱ्याचदा अनेक गुंतवणूकदार बाजारातील इतर योजनांपेक्षा कितीतरी पट अधिक परतावा देणाऱ्या योजनांच्या मोहात पडून आपले नुकसान करून घेतात. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार कमी परतावा असला तरी बँक ठेवी, पोस्टातील अल्पबचत योजना, एलआयसी पॉलिसी अशा सुरक्षित योजनांमध्ये गुंतवणूक करतात पण त्यामुळे त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य होणं कठीण होतं. बँकेतील मुदत ठेवीचे व्याजदर , कालावधी (Term) हे निश्चित केलेले असतात. त्यानुसारच गुंतवणूकदाराला गुंतवणूक करावी लागते. ठराविक कालावधीसाठी ठराविक व्याजदर निश्चित केलेला असतो, त्यामुळे ज्या मुदतीसाठी आपण पैसे गुंतवले आहेत, त्या मुदतीनंतर व्याजासह किती रक्कम परत मिळणार याची गुंतवणूकदाराला माहिती असते.

सिगरेटमुळे वाचले प्राण, डोळ्यांदेखल कोसळलं भलंमोठं झाड; पाहा, थरारक VIDEO

मात्र म्युच्युअल फंडामध्ये असा निश्चित परतावा (Fix Return) सांगता येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या योजना शेअर बाजाराशी निगडीत असतात. त्यामुळे शेअर बाजारात होणाऱ्या चढ-उतारांचा या योजनेतील परताव्यावर परिणाम होत असतो. त्याशिवाय म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार असतात, कालावधी वेगळा असतो. त्यापैकी गुंतवणूकदाराने कोणता पर्याय निवडला आहे, गुंतवणुकीचा कालावधी किती आहे यावरही त्याचा परतावा अवलंबून असतो. तसंच म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ज्या शेअर बाजारांमध्ये केली जाते त्या शेअर बाजारांची कार्यपद्धतीत फरक असू शकतो, त्याचाही परिणाम परताव्यावर होत असतो. तसेच फंडाची कामगिरी ही फंड व्यवस्थापकाच्या कौशल्यावरही अवलंबून असते. या सगळ्या घटकांचा परिणाम परताव्यावर होत असतो, त्यामुळे म्युच्युअल फंडाच्या परताव्याबाबत कोणतीही हमी देता येत नाही.

म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर विविध आर्थिक घडामोडींचा कसा परिणाम होतो, याचे एक उदाहरण बघू या. 2017 मध्ये म्युच्युअल फंडानी अगदी लक्षणीय कामगिरी केली होती. गुंतवणूकदारांना भरभरून नफा दिला होता. त्यामुळे 2018 मध्येही अशीच तेजी राहणार अशी अपेक्षा होती, मात्र एक फेब्रुवारी 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget) 10 टक्के भांडवली नफा कर (कॅपिटल गेन टॅक्स-Capital Tax Gain) लावण्याची तरतूद करण्यात आली आणि शेअर बाजाराच्या घोडदौडीला लगाम लागला. परिणामी परकीय वित्त संस्थांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अमेरिका आणि चीनचे व्यापारी युद्ध, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली वाढ, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, परकीय चलनाच्या गंगाजळीत झालेली घट, वाढती व्यापारी तूट अशा अशी अनेक आर्थिक संकट आली आणि त्यामुळं शेअर बाजार गडगडला. स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांचे शेअर्स कोसळले. त्याचा परिणाम अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या नफ्यावर झाला. खरंतर फंड मॅनेजर गुंतवलेल्या रकमेवर निर्देशांकापेक्षा चांगला परतावा मिळवून देण्यात यशस्वी ठरतात. मात्र, 2018 हे वर्ष त्याला अपवाद ठरले. सगळीकडून आलेल्या संकटामुळे अनेक फंड मॅनेजर्सना बाजारातील चढउतारावर मात करण्यात यश आलं नाही. त्यामुळे या वर्षातील म्युच्युअल फंडांचा परतावा खूपच घसरलेला होता. या काळात इक्विटीपेक्षा कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करणाऱ्या फंडांचा परतावा तुलनेत चांगला राहिला. अनेक कारणांनी शेअर बाजारात होणाऱ्या चढ-उतारांमुळे परताव्याचा एक निश्चित दर सांगणे शक्य नसते.

म्युच्युअल फंडांचा परतावा हा गुंतवणूक कालावधीतील सरासरीवर अवलंबून राहतो. म्हणजे एखाद्या वर्षी परतावा कमी आला आणि एखाद्या वर्षी चांगला मिळाला तर दोन्ही वर्षांतील परताव्यांची सरासरी होऊन परताव्यात संतुलन साधलं जातं. त्यामुळे म्युच्युअल फंडांत दीर्घकाळ गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. कारण सरासरीने मुदतीअखेर परतावा चांगलाच मिळतो.

'ओमिक्रॉन'चा दबाव, शेअर बाजारात पडझड सुरुच; फार्मा सेक्टरव्यतिरिक्त सर्व सेक्टर लाल निशाण्यावर

गेल्या दीड वर्षात कोरोना साथीच्या संकटामुळे शेअर बाजारात अनेक चढ-उतार होत राहिले. मात्र आता सगळीकडे अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यानं देशातील दोन्ही प्रमुख शेअर बाजारांच्या निर्देशांकानी म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीने अगदी अल्पावधीत ऐतिहासिक विक्रमी पातळी पार केल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक शेअर्स उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे त्यात गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडांना भरभक्कम नफा झाला आहे. त्यामुळे आधीचे नुकसान भरून निघणार आहे.

म्युच्युअल फंडांचे डेट फंड्स, इक्विटी फंड आणि हायब्रीड फंड असे तीन प्रमुख प्रकार आहेत. त्यापैकी कोणत्या फंडात गुंतवणूक केली आहे, यावरही परतावा अवलंबून असतो. डेट फंड्स हे सरकारी सिक्युरिटीज आणि रोख्यांसारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. कमी जोखमीत अधिक परतावा देणारे हे फंड असतात. तर इक्विटी फंड मोठ्या प्रमाणात शेअर्समध्ये गुंतवणूक करतात त्यामुळे या फंडांमध्ये जोखीम अधिक असते आणि त्याचा परतावाही अधिक अस्थिर असतो. हायब्रीड फंड हे इक्विटी आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या सिक्युरिटीजमघ्ये गुंतवणूक करतात. यात शेअर्सचे प्रमाण शून्य ते 100 टक्के असे कितीही असू शकते. त्यामुळे यातील परतावाही अस्थिर असतो.

Business Idea : Amul सोबत व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

तसेच काही फंड अल्प मुदतीचे असतात. अशा शॉर्ट टर्म (Short Term)फंडामध्ये परताव्यात संतुलन साधण्यास जास्त संधी नसते. उदाहरणार्थ तीन वर्षे मुदतीसाठी गुंतवणूक केली असेल आणि दोन वर्षे शेअर बाजारात घसरणीचा कल अधिक असेल तर परतावा कमीच राहणार आहे. तेच ही गुंतवणूक मध्यम म्हणजे पाच ते सात वर्षे किंवा दीर्घ म्हणजे सात ते दहा किंवा त्याहून अधिक काळ केली तर परतावा अधिक चांगला मिळण्यास जास्त वाव मिळतो.

अशा विविध कारणांमुळे म्युच्युअल फंडांचा परतावा निश्चित दराने सांगणे शक्य नसते. त्यामुळे म्युच्युअल फंडाचा परतावा हा अंदाजे एका पट्ट्यात सांगितला जातो. म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक फायदेशीर करायची असेल तर दीर्घकाळ गुंतवणूक करणे योग्य ठरते.

First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds