मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SIP मध्ये कशी कराल गुंतवणूक? असं प्लॅनिंग केल्यास तयार होईल 10.19 कोटी रुपयांचा फंड

SIP मध्ये कशी कराल गुंतवणूक? असं प्लॅनिंग केल्यास तयार होईल 10.19 कोटी रुपयांचा फंड

गुंतवणुकीचा विचार तुम्ही करत असाल (Investment planning) तर तुमच्यासाठी SIP (What is SIP?) चांगला पर्याय ठरू शकतो. एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). जाणून घ्या सविस्तर

गुंतवणुकीचा विचार तुम्ही करत असाल (Investment planning) तर तुमच्यासाठी SIP (What is SIP?) चांगला पर्याय ठरू शकतो. एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). जाणून घ्या सविस्तर

गुंतवणुकीचा विचार तुम्ही करत असाल (Investment planning) तर तुमच्यासाठी SIP (What is SIP?) चांगला पर्याय ठरू शकतो. एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). जाणून घ्या सविस्तर

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर: करोडपती बनण्याचं अनेकांचं स्वप्न असत. मात्र मेहनत आणि योग्य गुंतवणुकीशिवाय ते शक्य होत नाही. तुम्ही योग्य रक्कम योग्य ठिकाणी गुंतवली तर हे स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. अशाप्रकारे गुंतवणुकीचा विचार तुम्ही करत असाल (Investment planning) तर तुमच्यासाठी SIP (What is SIP?) चांगला पर्याय ठरू शकतो. एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan) अर्थात म्युच्युअल फंड एसआयपी (Mutual fund SIP). कमाई करणाऱ्यांसाठी एसआयपी हा सर्वात आकर्षक पर्यायांपैकी एक आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा ही  सर्वात बेस्ट योजना आहे. या माध्यमातून तुम्ही दरमहा छोटी रक्कम गुंतवून दीर्घ कालावधीत एक चांगला फंड जमा करू शकता. Mutual Fund SIP योजना याकरताही महत्त्वाची आहे कारण यामध्ये तुम्हाला एकरकमी मोठी रक्कम जमा करायची नसते. तुम्ही तुम्हाला परवडेल अशा रकमेपासून सुरुवात करू शकता. हळूहळू ही रक्कम वाढवल्यास तुम्हाला मोठा फंड उभारण्यात मदत होईल. हे वाचा-Aadhar Card वरील फोटो आवडत नाही का? अशाप्रकारे लगेच करा बदल कशाप्रकारे तयार कराल कोट्यवधींचा फंड? गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, जर एखादा गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणुकीच्या ध्येयाबद्दल स्पष्ट असेल, तर म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर (Mutual fund SIP calculator) ही त्याची पहिली योग्य निवड ठरेल. गुंतवणुकीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी किती SIP पुरेसे असेल हे या कॅलक्युलेटरमुळे जाणून घेण्यास मदत होईल. जर एखाद्या गुंतवणुकदाराला वयाच्या 50व्या वर्षी 10 कोटी हवे असतील तर मग किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल? तज्ज्ञांच्या मते, 50 व्या वर्षी 10 कोटी मिळवणे हे एक महत्त्वाकांक्षी ध्येय आहे आणि यासाठी गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षी लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे. हे वाचा-लोन घेण्यासाठी आवश्यक दस्तावेज, पगारधारक किंवा सेल्‍फ एम्‍प्‍लॉइडसाठी महत्त्वाचे गुंतवणुकदाराकडे गुंतवणूक करण्याासाठी एकरकमी फंड नसल्यास एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. गुंतवणूकदारांना असा सल्ला देण्यात येतो की, त्यांनी स्टेप-अप एसआयपी गुंतवणूक सुरू ठेवणे आवश्यक आहे. ज्यामध्ये एखाद्याचा मासिक एसआयपी एखाद्या वार्षिक एसआयपीशी लिंक असेल. मात्र 50व्या वर्षापर्यंत 10 कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर, पारंपरिक 10 टक्के वार्षिक स्टेप-अप ऐवजी मासिक एसआयपीमध्ये 15 टक्के वार्षिक स्टेपअपचे पालन करणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडाची निवड करावी कारण यामुळे गुंतवणुकीच्या कालावधीत त्यांना किमान 12 टक्के परतावा मिळण्यास मदत होईल. वाचा काय आहे कॅलक्युलेशन? 25 वर्षांच्या मासिक एसआयपीवर 12 टक्के रिटर्न गृहित धरून, म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरनुसार 50 व्या वर्षी 10 कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 15 टक्के वार्षिक स्टेप-अपसह 15000 रुपये मासिक SIP मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, गुंतवणूकदाराने वर नमूद केलेल्या म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक धोरणाचे पालन केल्यास 50 वर्षांच्या वयात मॅच्युरिटी रक्कम ₹ 10.19 कोटी असेल.
First published:

Tags: Investment, Money, Savings and investments

पुढील बातम्या