मराठी बातम्या /बातम्या /मनी /

64.8% चा जबरदस्त रिटर्न! या फंडमधील 10000 रुपयांच्या गुंतवणुकीचे बनले 1.57 कोटी

64.8% चा जबरदस्त रिटर्न! या फंडमधील 10000 रुपयांच्या गुंतवणुकीचे बनले 1.57 कोटी

ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंडाचा परतावा चांगला आहे. या Mutual Fund ने एका वर्षात 64.8%, दोन वर्षात 25.68 आणि पाच वर्षांत 14.95% परतावा दिला आहे.

ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंडाचा परतावा चांगला आहे. या Mutual Fund ने एका वर्षात 64.8%, दोन वर्षात 25.68 आणि पाच वर्षांत 14.95% परतावा दिला आहे.

ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंडाचा परतावा चांगला आहे. या Mutual Fund ने एका वर्षात 64.8%, दोन वर्षात 25.68 आणि पाच वर्षांत 14.95% परतावा दिला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

ंनवी दिल्ली, 24 ऑक्टोबर: तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Investment in Mutual Fund) करत असाल तर ही तुमच्यासाठी फायद्याची बातमी असू शकते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीने भरलेली असते, तरीही गुंतवणूकदारांमध्ये सध्या या गुंतवणुकीला विशेष पसंती मिळते आहे. गेल्या एक वर्षात, दोन वर्षे आणि पाच वर्षांत, मल्टी अॅसेट श्रेणी (ए) म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला (Get good Return in mutual Fund) आहे. यामध्ये सर्वात जास्त परतावा ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंडाचा आहे. या Fund ने एका वर्षात 64.8%, दोन वर्षात 25.68 आणि पाच वर्षांत 14.95% परतावा दिला आहे.

सध्या भारतीय शेअर बाजार तेजीत आहे. भारतीय शेअर बाजारात 61 हजार अंकांच्या आसपास व्यवहार होत आहेत. असे असले तरीही गेल्या चार दिवसांपासून त्यात खूप चढ-उतार होत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी अॅसेट अॅलोकेशनबाबत काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत, मल्टी अॅसेट फंड गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा-आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणुकीचे पर्याय,5 वर्षांत मिळाला तब्बल 251% परतावा

काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?

ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक आणि हेज फंड गुंतवणूकदार रे डालिओ यांच्या मते, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे मालमत्ता वाटपासाठी मिश्र धोरण असणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांकडे संतुलित, संरचित पोर्टफोलिओ असावा. त्यांनी वेगवेगळ्या वातावरणात चांगली कामगिरी करणारा पोर्टफोलिओ ठेवण्याचा सल्ला दिला आहे अर्थात अनेक क्षेत्रांमध्ये आणि अनेक शेअर्समध्ये पैसा गुंतवला पाहिजे.

ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंड व्यतिरिक्त, Axis Triple Advantage Fund ने एका वर्षात 41.26% परतावा दिला आहे. दोन वर्षात 22.23% आणि पाच वर्षात 13.34% परतावा दिला आहे. एचडीएफसी मल्टी अॅसेट फंडाने एका वर्षात 31.02%, दोन वर्षात 21.01 आणि पाच वर्षांत 11.11% परतावा दिला आहे. SBI मल्टी अॅसेट फंडाने एका वर्षात 22.78%, दोन वर्षात 14.88 आणि पाच वर्षात 9.89% परतावा दिला आहे.

वाचा-तुमचे PF चे पैसे येतील धोक्यात जर शेअर केला यापैकी कोणताही नंबर, EPFO कडून अलर्ट

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलबाबत बोलायचे झाले तर हा फंड 10-80% इक्विटीमध्ये, 10-35% डेटमध्ये, 10-35% गोल्ड ETF मध्ये तर 0-10% रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (Rits) आणि इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (WITs) मध्ये गुंतवणूक करतो. आयसीआयसीआय प्रूडेंशियलचा रिटर्न मल्टी अॅसेट श्रेणीतील इतर फंडांपेक्षा चांगला आहे.

गुंतवणूकदार झाले मालामाल

आयसीआयसीआय प्रूडेंशियल मल्टी अॅसेट फंड ऑक्टोबर 2002 मध्ये सुरू करण्यात आला. त्याची नेट असेट्स व्हॅल्यू (एनएव्ही) जवळपास 39 पटीने वाढली आहे. म्हणजे 10 रुपयांची गुंतवणूक 19 वर्षांत 390 रुपये झाली आहे. जर एखाद्याने एसआयपीद्वारे महिन्याला या फंडात 10 हजार रुपये गुंतवले असतील तर सध्या ही रक्कम 1.57 कोटी रुपये झाली आहे. यात एकूण गुंतवणूक फक्त 22.8 लाख रुपये असणार आहे.

वाचा-Work From Home लवकरच संपणार! काय आहे TCS, Wipro आणि Infosys चा प्लॅन?

सप्टेंबर 2021 पर्यंत आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल योजनेने इक्विटीमध्ये 63.6% गुंतवणूक केली. या पोर्टफोलिओच्या टॉप 4 क्षेत्रांमध्ये ऑटो, पॉवर, टेलिकॉम आणि मेटलचा समावेश आहे. सध्याच्या मार्केट वातावरणात, ही योजना इक्विटीमध्ये 10-80% गुंतवणूक करते. तर सामान्य वातावरणात ते 65 ते 75%पर्यंत कमी होते.

First published:

Tags: Investment, Savings and investments, Share market