Home /News /money /

म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं होणार फायदेशीर, बजेटमध्ये या करात होणार बदल?

म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणं होणार फायदेशीर, बजेटमध्ये या करात होणार बदल?

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना या बजेटमध्ये मोठा दिलासा मिळू शकतो. CNBC आवाज ला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, सरकार या बजेटमध्ये काही अटींसह LTCG चे प्रभावी दर कमी करू शकतं.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना या बजेटमध्ये मोठा दिलासा मिळू शकतो. CNBC आवाज ला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, सरकार या बजेटमध्ये काही अटींसह LTCG चे प्रभावी दर कमी करू शकतं. LTCG मध्ये दिलासा देताना सरकार इक्विटी आणि नॉन इक्विटी प्रॉडक्टमध्ये दिलासा देऊ शकतं. या बजेटमध्ये म्युच्युअल फंड्स (Mutual Funds), व्हेंचर कॅपिटल (Venture Capital), रिअल इस्टेट (Real Estate)यामध्येही सूट मिळू शकते. हा असू शकतो पर्याय LTCG नुसार 1 वर्षांची मुदत वाढवून ती 3 वर्षं करण्यावर विचार केला जातोय. एक वर्षापर्यंत केवळ 15 टक्के LTCG तरतूद होऊ शकते. 1 से 3 वर्षांपर्यंत 10 टक्के LTCG ठेवला जाऊ शकतो आणि 1 लाख रुपयांपर्यंतची कमाई टॅक्स फ्री केली जाऊ शकते. 3 वर्षांपेक्षा जास्त अवधीवर LTCG लावला जाणार नाही, अशीही शक्यता आहे. लाँग टर्म कॅपिटल गेन लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये घर, मालमत्ता, बँक एफडी, दागिने, बाँड, NPS आणि कार यातून झालेल्या फायद्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागत होता. पण आता याचा समावेश स्टॉक मार्केटमध्ये करण्यात आला आहे. (हेही वाचा : PMC नंतर ही बँक बुडण्याचा धोका, खातेदारांचा जीव टांगणीला) दोन घरं विकण्याच्या मर्यादेतून सूट रिअल इस्टेट क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं. सध्या दोन घरं विकण्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. नगरविकास मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रिअल इस्टेटला उत्तेजन देण्यासाठी खॅपिटल गेन्स टॅक्समध्ये कपात केली जाईल. त्याचवेळी दोन घरं विकण्याची मर्यादा वाढवली जाईल. यामुळे घरांची खरेदी - विक्री वाढू शकते. याशिवाय नॉन लिस्टेड कंपन्यांचं व्हेंचर कॅपिटल वाढवण्यासाठीचा कर तर्कसंगत केला जाईल. इथे सरचार्जची तरतूद आहे. यात बजेटमध्ये बदल होऊ शकतो. (हेही वाचा : दिवसा स्वस्त आणि संध्याकाळी महाग होणार वीज, ग्राहकांना होणार फायदा) ==========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Budget 2020, Money, Mutual fund

    पुढील बातम्या