अपत्याच्या नावे रोज करा 100 रुपयांची बचत, 15 वर्षांनी होईल 34 लाखांचा मालक

अपत्याच्या नावे रोज करा 100 रुपयांची बचत, 15 वर्षांनी होईल 34 लाखांचा मालक

तुम्ही योग्य बचत केलीत तर नक्कीच भविष्यकाळ सुखावह जाऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 05 मे : तुम्ही योग्य बचत केलीत तर नक्कीच भविष्यकाळ सुखावह जाऊ शकतो. अगदी सोप्या गुंतवणुकीही करता येतात. तुम्ही तुमच्या अपत्याच्या नावे रोज फक्त 100 रुपये बचत केलीत तर 15 वर्षांत 34 लाख रुपये जमा करू शकता. बचत जितक्या लवकर सुरू कराल, तेवढा फायदा जास्त होईल. त्यासाठीच आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या चांगल्या स्किम्सबद्दल सांगतो.

म्युच्युअल फंडात मिळतात चांगले रिटर्न - बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( SIP )द्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. अनेक इक्विटी म्युच्युअल फंडांनी लाँच झाल्यानंतर गेल्या 15 ते 20 वर्षांत 20 टक्के रिटर्न दिलेत. थोडा धोका पत्करायची तयारी ठेवलीत तर हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.

देशातल्या दुसऱ्या मोठ्या सरकारी बँकेनं दिला ग्राहकांना झटका, EMI मध्ये झाली वाढ

असा तयार होईल 34 लाखांचा फंड - तुम्ही तुमच्या अपत्याच्या नावानं रोज 100 रुपये म्हणजे महिन्याला 3 हजार रुपये SIP करा. ही गुंतवणूक 15 वर्षांसाठी करा. म्हणजे दर वर्षी तुम्हाला 20 टक्के रिटर्न मिळतील. 15 वर्षांत तुमची गुंतवणूक वाढून जवळजवळ 34 लाख रुपये होतील.  15 वर्षात तुमची गुंतवणूक असेल 5.40 लाख रुपये. ती 34 लाख होणार म्हणजे 28.60 लाख रुपये जादा होणार.

तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं खरं की खोटं? अशी टाळा फसवणूक

तज्ज्ञांच्या मते कमी धोका असलेली गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड. वेगवेगळ्या फंडात पैसे गुंतवले की ते वेगवेगळे स्टाॅक आणि बाँडमध्ये राहतात. एखाद्या कंपनीचा तोटा झाला तर दुसऱ्या कंपनींना फायदा मिळालेला असतो. आर्थिक तोल साधला जातो.

चांगले रिटर्न देणारे फंड - काही फंड खूप चांगलं काम करतात. त्यात रिटर्न चांगले मिळतात. आदित्य बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडात 15 वर्षात 15.20 टक्के, डीएसपी इक्विटी आॅपर्चुनिटी फंडात 14.67 टक्के, फ्रँकलीन इंडिया प्राइमा प्लॅनमध्ये 16.52 टक्के, HDFC टाॅप 100 फंडात 15.17 टक्के रिटर्न मिळेल.

कुठल्याही कम्प्युटरवरून आधार कार्ड डाउनलोड करत असाल तर 'ही' काळजी घ्यायलाच हवी

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी नियमात बदल - सेबीनं म्युच्युअल फंडाबद्दल वेगळा निर्णय घेतलाय. यामुळे तुमचा नफा वाढेल. सेबीनं टोटल एक्सपेन्स रेशओ म्हणजे TER कमी केलाय. यामुळे गुंतवणुकीदारांना रिटर्न जास्त मिळतील.

VIDEO: 15 गावांमधील श्रमदानात अजित पवार कुटुंबियासोबत सहभागी

First published: May 5, 2019, 2:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading