रोज फक्त 30 रुपये बचत करा आणि मिळवा 6 लाख रुपये, 'असा' आहे सोपा उपाय

रोज फक्त 30 रुपये बचत करा आणि मिळवा 6 लाख रुपये, 'असा' आहे सोपा उपाय

तुम्ही योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक केलीत, तर नक्कीच लखपती बनू शकता.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : तुम्ही योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक केलीत, तर नक्कीच लखपती बनू शकता. तुम्हाला त्यासाठी म्युच्युअल फंड मदत करेल. तुम्ही रोज 30 रुपये बचत केलीत तर खूप भारही पडणार नाही. खर्च करूनही तुम्ही बचत करू शकता. त्यासाठी तुम्ही  SIP करून नियमित गुंतवणूक करा.

असा बनेल 6 लाखांचा फंड - तुम्ही रोज 30 रुपये वाचवलेत तर दर महिन्याला 900 रुपयांची बचत करू शकता. दर महिन्याला तुम्ही 900 रुपये SIPमार्फत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करा. बाजारात खूप म्युच्युअल फंड आहेत. त्यांनी गेल्या 15 वर्षांत 15 टक्के रिटर्न दिलेत. तेवढंच रिटर्न तुम्हाला मिळालं तर 15 वर्षात तुमच्याकडे 6 लाख रुपयांचा फंड तयार होईल.

किती होईल फायदा? - तुम्ही म्युच्युअल फंडात 15 वर्षासाठी गुंतवणूक करत असाल तर तुमची गुंतवणूक 1,62,000 रुपये होईल. तुमच्या SIPची व्हॅल्यू 6,01,656 रुपये होईल. म्हणजे तुम्हाला 4,39,656 रुपये फायदा होईल.

या फंडात आहेत 15 टक्के रिटर्न - काही फंड खूप चांगलं काम करतात. त्यात रिटर्न चांगले मिळतात. आदित्य बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडात 15 वर्षात 15.20 टक्के, डीएसपी इक्विटी आॅपर्चुनिटी फंडात 14.67 टक्के, फ्रँकलीन इंडिया प्राइमा प्लॅनमध्ये 16.52 टक्के, HDFC टाॅप 100 फंडात 15.17 टक्के रिटर्न मिळेल.

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी नियमात बदल - सेबीनं म्युच्युअल फंडाबद्दल वेगळा निर्णय घेतलाय. यामुळे तुमचा नफा वाढेल. सेबीनं टोटल एक्सपेन्स रेशओ म्हणजे TER कमी केलाय. यामुळे गुंतवणुकीदारांना रिटर्न जास्त मिळतील.

काळजाचा ठोका चुकणारा VIDEO; ट्रेन पकडण्याच्या नादात तोल गेला अन्...

First published: April 20, 2019, 12:21 PM IST

ताज्या बातम्या