मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mutual Fund : आपल्या गरजेनुसार योग्य त्या फंडाची निवड कशी करावी?

Mutual Fund : आपल्या गरजेनुसार योग्य त्या फंडाची निवड कशी करावी?

आपले आर्थिक उद्दिष्ट, आपली जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणूक क्षमता या बाबी गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या असतात. यासह आणखी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही योग्य म्युच्युअल फंडाची निवड करू शकता.

आपले आर्थिक उद्दिष्ट, आपली जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणूक क्षमता या बाबी गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या असतात. यासह आणखी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही योग्य म्युच्युअल फंडाची निवड करू शकता.

आपले आर्थिक उद्दिष्ट, आपली जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणूक क्षमता या बाबी गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या असतात. यासह आणखी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही योग्य म्युच्युअल फंडाची निवड करू शकता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 नोव्हेंबर : आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा (Future Financial Needs) पूर्ण करण्यासाठी बहुतांश गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांत (Mutual Fund)गुंतवणूक करणे पसंत करतात. सुरक्षित गुंतवणूक आणि कमी धोका ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. यासाठी बाजारात अनेक फंडांचे पर्याय उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या गरजेनुसार योग्य त्या फंडाची निवड कशी करावी असा प्रश्न गुंतवणूकदाराला नेहमी भेडसावत असतो. चांगला फायदा देणाऱ्या म्युच्युअल फंडांची नावं कुणी तरी सुचवावीत, अशी गुंतवणूकदाराची अपेक्षा असते. अर्थात एखादा फंड सर्वोत्तम असे नसते कारण फंडाची कामगिरी शेअर बाजाराशी आणि अन्य घटकांशी निगडीत असते. आपले आर्थिक उद्दिष्ट, आपली जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणूक क्षमता या बाबी गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या असतात. यासह आणखी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही योग्य म्युच्युअल फंडाची निवड करू शकता.

गुंतवणुकीचा उद्देश : सर्वांत आधी तुमच्या गुंतवणुकीचा हेतू, उद्दिष्ट (Target) निश्चित असले पाहिजे. त्याच्याशी मेळ खाणारा म्युच्युअल फंड निवडणे महत्त्वाचे ठरते. कारण प्रत्येक फंडाची गुंतवणूक उद्दिष्टे वेगळी असतात. काही अल्प मुदतीत जास्त परतावा देण्यासाठी अधिक जोखीम (risk) घेणारे असतात, त्यात नुकसान होण्याची किंवा परतावा (Return) कमी होण्याची शक्यता असते. काही फंड कर बचतीसाठीच (Tax Benefit) असतात. काही दीर्घ मुदतीचे असतात. काही सुरक्षित गुंतवणूकीला प्राधान्य देणारे असतात, ज्याचा परतावा कमी असतो. त्यामुळे तुम्हाला कमी मुदतीत जास्त परतावा देणारा फंड हवा असताना तुम्ही जर सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या फंडाची निवड केली तर तुमचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही.

Business Idea : Amul सोबत व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

निवृतीनंतरचे नियोजन, परदेश प्रवास अशा दीर्घकालीन उद्दिष्टासाठी (Long term target) फंड निवडायचा असेल तर इक्विटी किंवा बॅलन्स फंड योग्य ठरतील. अल्पकाळासाठी म्हणजे दोन महिन्यांसाठी पैसे बाजूला ठेवायचे असतील तर लिक्विड फंड (Liquid Fund) उत्तम निवड ठरेल. दरमहा नियमित उत्पन्न मिळवायचे उद्दिष्ट असेल तर मंथली इन्कम प्लॅन (Monthly Income Plan) किंवा इन्कम फंड (Income Fund) योग्य ठरेल.

फंडाची कामगिरी : एकदा आपल्या उद्दिष्टाशी मेळ खाणारा फंड प्रकार निश्चित झाला की त्या प्रकारातील उपलब्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या फंडातून एक योग्य फंड निवडण्याकरता त्या फंडाची कामगिरी (Track Record)बघणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्या म्युच्युअल फंड कंपनीचे प्रमोटर्स, त्यांची बाजारातील प्रतिमा आणि इतिहास लक्षात घ्या. तसेच फंडाचा वार्षिक परतावा, त्याची एनएव्ही याचाही आढावा घ्या. यामुळे फंडाच्या वाढीचा दर आणि परताव्यातील चढ-उतार लक्षात येतील. त्यानुसार चांगल्या फंडाची निवड करता येईल. अनेक कंपन्या म्युच्युअल फंडांची रँकिंग, रेटिंग (Rating) देत असतात. त्यानुसार तुम्हाला जे फंड गुंतवणुकीसाठी योग्य वाटतात त्यांची रेटिंग्ज जाणून घ्या. मात्र त्याचवेळी अनेकदा अशी रेटिंग्ज दिशाभूल करू शकतात हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे फंडाची निवड करताना केवळ रेटिंगवर विसंबून राहू नका. विविध फंड योजनाचे तुलनात्मक विश्लेषण करताना या निकषाचा विचार करा.

तसेच त्या फंडाचा मॅनेजर (Fund Manager)कोण आहे, तो कसे व्यवस्थापन करत आहे, हे ही जाणून घ्या. काही फंड मॅनेजर विशिष्ट प्रकारच्या फंडाच्या व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध असतात. त्यांच्या कुशल व्यवस्थापनामुळे तो फंड नेहमी चांगली कामगिरी करतो, अशा फंडाची निवड करणे फायद्याचे ठरते. अर्थात फंड निवडण्यासाठी विविध निकषांपैकी हा एक निकष आहे. केवळ या आधारे एखादा फंड चांगला किंवा एखादा फंड वाईट असे शिक्कामोर्तब करू नये.

21 व्या वर्षी सुरु केला बिझनेस, 26 व्या वर्षा झाली अब्जाधीश

फंडाचा प्रकार निवडा : कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या गटातील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे हे ठरवणेही महत्त्वाचे आहे. तुम्हाला शेअर्स म्हणजेच इक्विटीशी निगडीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप किंवा डेट फंड यापैकी कशात गुंतवणूक करायची हे ठरवा. तसेच मुदतीनुसार शॉर्ट, मीडियम किंवा लाँग टर्मपैकी कोणता फंड योग्य राहील ते ठरवा आणी त्यानुसार फंड निवडा.

खर्चाचं प्रमाण : गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंडाची निवड करताना त्या फंडाचे खर्चाचे प्रमाण (Charges) आणि एक्झिट लोड (Exit Load) तपासणे महत्वाचे आहे. बरेच गुंतवणूकदार याचा विचार करत नाहीत. कारण हे खर्चाचे प्रमाण खूप कमी असते. मात्र खर्चाचे प्रमाण अधिक असलेल्या फंडाची निवड परताव्यावर परिणाम करू शकते. फंडाद्वारे मिळणाऱ्या परताव्यामुळे खर्चाचे नुकसान भरून निघणे शक्य असले तरीही हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. काही फंडामध्ये मुदत पूर्ण होण्यापूर्वी आपण पैसे काढून घेतले तर त्यासाठी भरभक्कम एक्झिट लोड आकारला जातो. त्याचाही परताव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण निवडत असलेल्या फंडाचा एक्झिट लोड किती आहे याची माहिती घ्यावी.

देशात Bitcoin ला चलन म्हणून मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - केंद्रीय अर्थ मंत्रालय

फंडाची निवड केल्यानंतर त्यात गुंतवणूक केल्यानंतर त्याचे नियमित परीक्षण (Regular Review) करणेही महत्त्वाचे आहे. दर तीन महिन्यांनी गुंतवणूकीचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. यामुळे एखादी योजना आपल्या अपेक्षा पूर्ण करते की नाही हे ठरवणे सोपे जाते आणि आपल्या गरजेनुसार म्युच्युअल फंडाची योजना निवडण्यास मदत होते.

First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds