दररोज 50 रुपयांच्या बचतीनं तुम्हाला होईल 7 लाख रुपयांचा फायदा!

तुम्ही म्यूचुअल फंडातील या योजनेत पैसे गुंतवल्यास इतर योजनांच्या तुलनेत जास्त फायदा मिळेल.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 09:14 AM IST

दररोज 50 रुपयांच्या बचतीनं तुम्हाला होईल 7 लाख रुपयांचा फायदा!

भविष्याचा विचार करून अनेकदा पैशांची बचत केली जाते. यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग  अवलंबले जातात. यामध्ये आता दररोज 50 रुपयांची बचत केल्यानंतर 10 लाख रुपये मिळवता येतात. यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची गरज आहे.

भविष्याचा विचार करून अनेकदा पैशांची बचत केली जाते. यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग
अवलंबले जातात. यामध्ये आता दररोज 50 रुपयांची बचत केल्यानंतर 10 लाख रुपये मिळवता येतात. यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची गरज आहे.

एसाआयपी हा म्यूचुअल फंडात गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणुकीत धोका कमी असून चांगला परतावा मिळतो. यात निश्चित मुदतीपर्यंत गुंतवणूक केलीच पाहिजे असा नियम नाही. तसेच तुम्ही गुंतवणूक कधीही थांबवू शकता. यावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही.

तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत केलीत तर महिन्याला दीड हजार रुपये होतील. तुम्हाला म्यूचुअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागेल. 15 वर्षांपर्यंत तुम्ही याची मुदत ठेवू शकता.

सध्या असे अनेक म्युचुअल फंड आहेत ज्यांनी गेल्या 15 वर्षांत 15 टक्क्यांच्या दराने रिटर्न दिला आहे. याच दरानं रिटर्न मिळाला तर तुम्हाला दररोजच्या 50 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 वर्षांनी 10 लाख रुपये मिळतील.

कोणत्याही म्यूचुअल फंडाच्या योजनेत 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तरी त्याची रक्कम 2 लाख 70 हजार रुपये होईल. तर एसआयपीमध्ये एकूण 10 लाख 1 हजार 760 रुपये होतील. म्हणजेच यात 7 लाख 32 हजार 760 रुपयांचा फायदा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: money
First Published: Aug 26, 2019 09:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...