Home /News /money /

कमी जोखीमत FD पेक्षा जास्त परतावा हवा असेल तर या ठिकाणी करा गुंतवणूक! याविषयी आणखी जाणून घ्या

कमी जोखीमत FD पेक्षा जास्त परतावा हवा असेल तर या ठिकाणी करा गुंतवणूक! याविषयी आणखी जाणून घ्या

तुम्ही कमी जोखीम घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ब्लूचिप फंड तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. कसा ते जाणून घेऊया.

    मुंबई, 10 एप्रिल : जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्याबद्दल मर्यादित माहिती असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. याशिवाय, जर तुम्हाला त्यात कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करायची असेल, तर ब्लूचिप फंड श्रेणी तुमच्यासाठी योग्य असेल. येथे तुम्हाला कमी जोखमीसह चांगले उत्पन्न मिळू शकते. आम्ही तुम्हाला ब्लूचिप फंडांबद्दल सांगत आहोत. जेणेकरून तुम्हीही त्यात गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. ब्लूचिप फंड्स म्हणजे काय? हे लार्ज-कॅप म्युच्युअल फंड आहेत. वास्तविक, काही लार्ज-कॅप म्युच्युअल फंडांनी आपल्या नावांमध्ये ब्लूचिप जोडलं आहे. जसे अॅक्सिस ब्लूचिप फंड, आयसीआयसीआय प्रू ब्लूचिप फंड, एसबीआय ब्लूचिप फंड, कोटक ब्लूचिप फंड किंवा फ्रँकलिन ब्लूचिप फंड. याशिवाय लार्ज आणि मिड कॅप विभागातील मिरे अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप फंड, प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लूचिप फंड आहे. कमी जोखमीसह चांगला परतावा ब्लूचिप कंपन्या अशा कंपन्या आहेत ज्यांचा आकार खूप मोठा असून ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. असे मानले जाते की त्यांच्या समभागांमध्ये अस्थिरता कमी असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये गुंतवणूक केल्यावर नुकसान होण्याची शक्यता कमी आहे, विशेषत: दीर्घकालीन. लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांसाठी, शीर्ष 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून किमान 80% निधीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. Mutual Fund मध्ये SIP द्वारे गुंतवणुकीचा विचार करताय? ऑनलाईन सोप्या पद्धतीने भरा पैसे यामध्ये कोणी गुंतवणूक करावी? कमी जोखीम घेऊन शेअर बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ब्लूचिप फंडांची शिफारस केली जाते. किमान 5 वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन या योजनांमध्ये गुंतवणूक करावी. खरंतर यामध्ये लॉक-इन कालावधी नसतो, त्यामुळे तुम्ही आवश्यकतेनुसार पैसे काढू शकता. मात्र, लक्षात ठेवा की अल्पावधीत शेअर बाजारातील चढउतारांचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर अधिक होऊ शकतो तर दीर्घकाळात हा धोका कमी होतो. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे योग्य ठरेल म्युच्युअल फंडात पैसे एकत्र गुंतवण्याऐवजी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करावी. SIP च्या माध्यमातून तुम्ही त्यात दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता. यामुळे जोखीम आणखी कमी होते. कारण, त्यावर बाजारातील अस्थिरतेचा फारसा परिणाम होत नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Investment, Mutual Funds

    पुढील बातम्या