Home /News /money /

Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे वर्षभरात 340 टक्के नफा; तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी

Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे वर्षभरात 340 टक्के नफा; तज्ज्ञांच्या मते अजूनही कमाईची संधी

ट्रायडंट स्टॉकमध्ये (Trident Share) गेल्या एका महिन्यात 17 टक्के, 3 महिन्यांत 53 टक्के, 6 महिन्यांत 240 टक्क्यांहून अधिक आणि 1 वर्षात 340 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

    मुंबई, 25 जानेवारी : गेल्या काही ट्रे़डिंग सेशनपासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे. सोमवारी पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची निराशा होत आहे. बाजारात कमाईच्या संधी नेहमीच असतात. असे काही मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत ज्यात गुंतवणूकदारांची कमाई होत असते. ट्रायडंट कंपनीचा (Trident) स्टॉकही मल्टीबॅगर स्टॉक आहे. हा शेअर सातत्याने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देत आहे. झी बिझनेसच्या एका बातमीनुसार, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी कापड क्षेत्रातील या शेअरमध्ये 15 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ट्रायडंट स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात 17 टक्के, 3 महिन्यांत 53 टक्के, 6 महिन्यांत 240 टक्क्यांहून अधिक आणि 1 वर्षात 340 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Zomato चे शेअर मोठ्या घसरणीनंतर 9 टक्के वाढले, तज्ज्ञांच्या मते आता गुंतवणूक करावी का? मोतीलाल ओसवाल यांच्याकडून BUY रेटिंग मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये चांगला परतावा देण्याची चांगली क्षमता आहे. कंपनी वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी कंपनीने अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये वर्किंग कॅपिटल आणि सीटीसी चक्र कमी करण्यासाठी काम करणे आणि कॅश रिझर्व्ह तयार करणे समाविष्ट आहे. क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरताय तरी खराब होतोय Credit Score; लोनसाठी होतेय अडचण, वाचा सविस्तर 15 टक्के अपेक्षित परतावा ट्रायडंटच्या स्टॉकने सोमवारी इंट्राडेमध्ये 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटला टच केलं. हा शेअर 58 रुपयांच्या लेव्हलला ओपन झाला होता, मात्र नंतर शेअरमध्ये रिकव्हरी दिसून आली. मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे की, या शेअरमध्ये सध्याच्या बाजारभावापेक्षा 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते आणि हा स्टॉक 64 रुपयांच्या पातळीला टच करू शकतो. ट्रायडेंट कंपनी ही सूत, लिनेन, गव्हाच्या पेंढ्यावर आधारित कागद, रसायने आणि कॅप्टिव्ह पॉवरची आघाडीची उत्पादक आहे. कंपनी 100 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करते. याशिवाय पंजाब आणि मध्य प्रदेशात उत्पादन सुविधा आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    पुढील बातम्या