मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोठी बातमी : दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

मोठी बातमी : दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता

मागील एका वर्षापासून किंमतीत 25 ते 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे यावर्षी पाम तेलाच्या आयातीमध्ये 14 टक्क्यांची घट झाली असून त्याचा दरांवर स्पष्ट परिणाम दिसतो आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांच्या समस्यांमध्ये सतत वाढ होत आहे. आता खाण्याचं महाग होण्याची शक्यता आहे. तेल व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर (Diwali 2020) तेलाचे दर 160 रुपये प्रति किलोवर जाऊ शकतात. लग्नसमारंभांचा काळ सुरू झाल्यानंतर तेलाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोहरीच्या तेलातील भेसळीवर बंदी आणल्यानंतर फायदा होत नसल्याने, व्यावसायिकांकडून भाव वाढ केली जाण्याचं बोललं जात आहे. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरही तेल दरात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे, भारतीय बाजारात तेल दरात वाढीची शक्यता आहे. 30 टक्क्यांपर्यंत वाढ - मागील एका वर्षापासून किंमतीत 25 ते 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे यावर्षी पाम तेलाच्या आयातीमध्ये 14 टक्क्यांची घट झाली असून त्याचा दरांवर स्पष्ट परिणाम दिसतो आहे. खाण्याच्या तेलात गेल्या वर्षापासून वाढ झाली आहे. 2019 मध्ये शेंगदाणा तेल 140 प्रति किलो जवळपास होतं, जे आता 162 रुपयांवर पोहचलं आहे. 2019 मध्ये तिळाच्या तेलाचा भाव 120 प्रति किलो होता, तो आता 160 जवळपास पोहचला आहे. गेल्या वर्षी सोयाबिन तेलाचा भाव 89 प्रति किलो होता, आता तो 103 रुपयांपर्यंत आहे. पाम ऑईल 67 रुपयांवरून 98 रुपये झालं आहे. (वाचा - नोकरी करण्याआधीच तुमच्या मुलांच्या नावे असेल मोठी रक्कम;जाणून घ्या काय आहे प्लान) तेलाचे व्यापारी कपिल गुप्ता यांनी न्यूज 18शी बोलताना सांगितलं की, ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत तिळाच्या तेलात 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. सर्वाधिक विक्री होणारं तेलाचं पॅकेट 140 ते 150 रुपयांपर्यंत आहे. दिवाळीनंतर यात आणखी वाढ होऊ शकते. (वाचा - दिवाळीत दागिन्यांपेक्षा सोन्या-चांदीचं नाणं खरेदी करणं अधिक फायदेशीर) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणद्वारा (FSSAI) 1 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारने मोहरीच्या तेलात केलं जाणारं ब्लेन्डिंग अर्थात इतर कोणत्याही तेलाची भेसळीवर बंदी घातली आहे. या निर्णयाचा फायदा ग्राहकांसह, मोहरी उत्पादक शेतकऱ्यांनाही होणार असल्याचं, सरकारचं म्हणणं आहे. आतापर्यंत मोहरीच्या तेलात 20 टक्क्यांपर्यंत, ब्लेंडिग होत होती. परंतु आता यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना शुद्ध मोहरीच्या तेलाची विक्री करावी लागणार असल्याने त्यांचा खर्च वाढणार आहे. मोहरीचं यावर्षी कमी उत्पादन, ब्लेंडिग आणि तेलासाठी परराष्ट्र धोरणात झालेल्या काही बदलांमुळे हा परिणाम झाला आहे. मात्र, डिसेंबरनंतर तेलाच्या किंमतीत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Money

पुढील बातम्या