मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दिवाळीत सर्वसामान्यांना दणका, मोहरीसह खाद्य तेलांच्या दरात दिलासा नाहीच, भाव चढेच!

दिवाळीत सर्वसामान्यांना दणका, मोहरीसह खाद्य तेलांच्या दरात दिलासा नाहीच, भाव चढेच!

ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खरं तर, सणांमध्ये तेलाची वाढती मागणी आणि तेलबियांची कमतरता यामुळे सर्वत्र खाद्य तेलांच्या दरात वाढ होत आहे.

ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खरं तर, सणांमध्ये तेलाची वाढती मागणी आणि तेलबियांची कमतरता यामुळे सर्वत्र खाद्य तेलांच्या दरात वाढ होत आहे.

ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खरं तर, सणांमध्ये तेलाची वाढती मागणी आणि तेलबियांची कमतरता यामुळे सर्वत्र खाद्य तेलांच्या दरात वाढ होत आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खरं तर, सणांमध्ये तेलाची वाढती मागणी आणि तेलबियांची कमतरता यामुळे दिल्लीच्या बाजारात मोहरी / तेल, शेंगदाणे, सोयाबीन आणि क्रूड पाम ऑइल (सीपीओ) यासह जवळजवळ सर्व तेल आणि तेलबियांचे भाव वाढले (Edible Oil Price Hike) आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाने तेलबिया पिकांचे झालेले नुकसान पाहता खाद्यतेलाचे दरही (Edible Oil) वाढल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

दिवाळीनंतर मोहरीच्या मागणीत मोठी वाढ होईल

देशात 10-12 लाख टन मोहरीचा साठा आहे, जो मुख्यतः शेतकऱ्यांकडे आहे. सणासुदीची मागणी सातत्याने वाढत असून दिवाळीनंतर मोहरीच्या मागणीत मोठी वाढ होईल. अशा स्थितीत सलोनी शम्साबाद येथील मोहरीचा भाव गेल्या आठवड्याच्या अखेरीस 8,900 रुपयांवरून 9,200 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला. त्यामुळे मोहरी तेल आणि तेलबियांच्या दरात मोठी झेप नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर पेरणीला उशीर झाल्यामुळे पुढील मोहरी पिकाची आवक होण्यास सुमारे महिनाभराचा विलंब होऊ शकतो. मात्र, यावेळी मोहरीचे उत्पादन दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सुमारे 5 ते 10 लाख टन मोहरीचा साठा कायमस्वरूपी ठेवावा, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

जागतिक किमतीत वाढ झाल्याने मोहरीचे तेल महाग

केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले होते की, पुढील पीक फेब्रुवारी 2022 मध्ये आल्यानंतरच मोहरीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, खाद्यतेलांच्या जागतिक किंमती वाढल्यामुळे मोहरी तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. बिनौला तेलाच्या किंमती मजबूत झाल्यामुळे भुईमुगाच्या मागणीत वाढ झाली असून, त्यामुळे शेंगदाणा तेल आणि तेलबियांच्या दरातही वाढ झाली आहे. सोयाबीनचे नवीन पीक येण्यापूर्वीच वायदे व्यवहारात त्याचे भाव कमी आहेत. साधारणपणे नवीन पीक येण्याच्या वेळी भाव पाडले जातात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांची पिके कमी किमतीत विकावी लागतात.

हे वाचा - नराधम! चिमुकलीला चॉकलेटच्या बहाण्याने घेऊन गेला युवक, इमारतीत सापडला मृतदेह

कमी भावात पिकांची विक्री नाही

नवीन सोयाबीन पिकाची आवक कमी असून, कमी भावात विक्री करण्यास शेतकरी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सोयाबीन तेल आणि तेलबियांचे भाव आठवड्यात वाढले. कच्च्या पाम तेल (सीपीओ) आणि पामोलिनच्या किंमती देखील अहवाल सप्ताहात मलेशिया एक्सचेंजवर मजबूत राहिल्या, तर सणासुदीच्या मागणीनुसार कपाशीच्या तेलामध्येही सुधारणा झाली.

मोहरी कच्ची घाणीचे भाव किती वाढले?

मोहरीचे भाव गेल्या आठवड्यात 145 रुपयांनी वाढून 8,870-8,900 रुपये प्रति क्विंटल झाले होते, गेल्या आठवड्याच्या अखेरीस ते 8,730-8,755 रुपये प्रति क्विंटल होते. मोहरी दादरी तेलाची किंमत मागील आठवड्याच्या तुलनेत 450 रुपयांनी वाढून आठवड्याच्या शेवटी 18,000 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. मोहरी पक्की घनी तेलाचे भाव 40 रुपयांनी वाढून 2,705-2,745 रुपये झाले आणि कच्ची घणीचे भाव 40 रुपयांनी वाढून 2,780-2,890 रुपये प्रति टिन झाले.

हे वाचा - सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतींची कन्या करणार धर्मांतर, लवकरच होणार हिंदू

सोयाबीनचे भाव किती वाढले?

सणासुदीच्या काळात मागणीत वाढ झाल्यामुळं आठवड्याच्या शेवटी सोयाबीन धान्याचे भाव 50 रुपयांनी वाढून 5,300-5,500 रुपये प्रति क्विंटल झाले. त्याचबरोबर सोयाबीन लूजची किंमत 5,050-5,150 रुपये प्रति क्विंटलच्या पातळीवर राहिली. सोयाबीन दिल्लीचे भाव 370 रुपयांनी वाढून 14,050 रुपये, सोयाबीन इंदूर 420 रुपयांनी वाढून 13,670 रुपये आणि सोयाबीन डिगम 380 रुपयांनी वाढून 12,580 रुपये प्रति क्विंटल झाले.

पामतेलाच्या किमतीत वाढ

कच्च्या पाम तेलाची (सीपीओ) किंमत 300 रुपयांनी वाढून 11,450 रुपये प्रति क्विंटल झाली. पामोलिन दिल्लीचे भाव 160 रुपयांनी वाढून 13,060 रुपये आणि पामोलिन कांडला तेल 60 रुपयांनी वाढून 11,860 रुपये प्रति क्विंटल झाले. त्याचबरोबर कापूस तेलाचा भाव 450 रुपयांनी वाढून 13,950 रुपये प्रतिक्विंटल झाला.

First published:

Tags: Diwali 2021, Inflation