Elec-widget

PMC बँकेला आणखी एक धक्का, जॉय थॉमस यांच्यावर गुन्हा दाखल

PMC बँकेला आणखी एक धक्का, जॉय थॉमस यांच्यावर गुन्हा दाखल

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले. आता या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 सप्टेंबर : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले. या बँकेच्या खातेदारांची खाती गोठवण्यात आली. आता या बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जसबीर सिंह मठ्ठा यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेकडे हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. PMC बँकेचे अधिकारी आणि HDIL च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे 4 हजार 355 कोटींचं नुकसान झालं, असं आढळून आलं आहे. PMC बँकेचे माजी संचालक जय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि HDIL चे राकेश वाधवान, सारंग वाधवान यांचीही FIR मध्ये नावं आहेत.

याआधी, RBIच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते.बँकेतल्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचं सांगत 6 महिने सर्व व्यवहारांवर निर्बंध घातल्याचं RBIने पत्रात म्हटलं होतं. या कारवाईमुळे PMC बँकेला नवी कर्ज देता येणार नाही, तसंच ठेवी स्वीकारता येणार नाही. या बँकेच्या राज्यात 135 शाखा आहेत. या सर्व शाखांमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. RBI या कारवाईमुळे बँकेच्या शेकडो खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. PMC बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखामध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत.

(हेही वाचा : भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 क्षेत्रांतल्या उद्योगांची मोठी घसरण)

पीएमसी बँकेवर कोणकोणते निर्बंध?

> रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही

Loading...

> जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही

> बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही

> नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत

> बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही

> निर्बंध सहा महिन्यासाठी लागू असतील, त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल.

=======================================================================================================

VIDEO : आदित्य ठाकरेंच्या घोषणेनंतर संजय राऊत म्हणतात, 'मुख्यमंत्री होणार तर...'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneyPMC
First Published: Sep 30, 2019 09:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...