मुंबई, 25 मार्च : मल्टिप्लेक्स कंपन्यांचे शेअर्स पुन्हा तेजीत आले आहेत. शुक्रवारी पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्सच्या (INOX) लेझरमध्ये उसळी दिसली. यामुळे त्यांच्या किमती 25 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. शुक्रवारी या शेअर्समध्ये झालेल्या उसळीचे कारण RRR हा बिग बजेट चित्रपट असल्याचे मानले जात आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.
शेअरची किंमत 25 महिन्यांच्या उच्चांकावर
आयनॉक्सचा स्टॉक शुक्रवारी 479 वर पोहोचला आहे. यापूर्वी 26 फेब्रुवारी 2020 रोजी या शेअरने या किमतीला टच केला होता. पीव्हीआरचे शेअर्स 1,839 रुपयांवर पोहोचले. यापूर्वी 28 फेब्रुवारी 2020 रोजी या स्टॉकची किंमत या पातळीवर पोहोचली होती.
Multibagger stock: 27 रुपयांचा शेअर 2420 रुपयांवर, गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई
शेअर्स 7 टक्क्यांपर्यंत वाढले
शुक्रवारी 12:16 वाजता, PVR च्या शेअरची किंमत 4 टक्क्यांहून अधिक उसळीसह 1853.15 रुपयांवर व्यवहार करत होती. INOX च्या शेअरची किंमत 7 टक्क्यांहून अधिक वाढून 476.95 रुपयांवर होती. गेल्या सहा सत्रांपैकी पाच सत्रांमध्ये आयनॉक्सचा शेअर वधारला आहे. या कालावधीत सुमारे 17 टक्के वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत स्टॉक 34 टक्क्यांनी वाढला आहे.
QR Code scam: कोणत्याही बँकेत खातं असेल तर वेळीच व्हा सावध! SBI चा महत्त्वाचा इशारा
बिग बजेट चित्रपट
7 मार्चपासून PVR चा स्टॉक जवळपास 22 टक्क्यांनी वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत तो 41 टक्क्यांनी वाढला आहे. येथे, गुंतवणूकदारांनी गेल्या काही काळापासून मल्टिप्लेक्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये स्वारस्य दाखवले आहे. याचे कारण अलीकडे आलेले अनेक मोठे चित्रपट आहे. यामध्ये झुंड, काश्मीर फाइल्स, बच्चन पांडे आणि आता आर.आर.आर.
निर्बंध काढून टाकण्याचे फायदे
मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सरकारने अनेक निर्बंध लादले होते. ज्या उद्योगावर याचा सर्वाधिक परिणाम झाला. त्यात मल्टिप्लेक्स उद्योगाचाही समावेश होता. पण, आता निर्बंध उठवल्यामुळे लोक पुन्हा चित्रपट बघायला लागले आहेत.
RRR सिनेमाच्या निर्मितीसाठी किमान 300 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. या पीरियड ड्रामामध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट देखील आहे. अभिनयाच्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांमध्ये खास ओळख निर्माण करणाऱ्या अजय देवगणनेही यात काम केले आहे.
हा चित्रपट तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याची चांगली कामगिरी अपेक्षित आहे. अनेक बिग बजेट चित्रपट पुढे येणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Movie release, Share market