मराठी बातम्या /बातम्या /मनी /Multibagger Stocks: 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदार मालामाल, एक लाख बनले एक कोटी

Multibagger Stocks: 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदार मालामाल, एक लाख बनले एक कोटी

मुंबई, 28 नोव्हेंबर : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी (Share Market Investors) संयम महत्त्वाचा असतो. कारण शेअर बाजारात पैसा हा स्टॉक खरेदी-विक्रीत नसून शक्य तितक्या वेळ स्टॉक ठेवण्यामध्ये असतो. स्टॉक विकत घेणे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करणे आणि म्हणून जोपर्यंत नफ्याची क्षमता आहे तोपर्यंत स्टॉक ठेवला पाहिजे. मल्टीबॅगर स्टॉक्सची (Multibagger Stock) एक लांबलचक यादी आहे ज्यांनी दीर्घ कालावधीत लाखो गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची उलाढाल केली आहे.

आज जरी कोरोनाच्या नवीन प्रकारांच्या भीतीने शेअर बाजार कोसळत असला तरी दीर्घकालीन गुंतवणुकीत नेहमीच नफा दिला आहे. यात गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे कमावले आहेत. अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना एका दशकात 100 पट नफा दिला आहे. गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये थेट एक कोटी रुपये झाले आहेत. आता अशा काही मल्टीबॅगर स्टॉक्सची चर्चा करुयात ज्यांची किंमत 11 वर्षात 1 लाख ते 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.

या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक

बजाज फायनान्स (Bajaj Finance)

बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत नोव्हेंबर 2011 मध्ये 64-65 रुपये होती, तर एप्रिल 2010 मध्ये ती 40 रुपयांच्या आसपास ट्रेडिंग करत होती. आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर या शेअरची किंमत 6,780 रुपये आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 11 वर्षांपूर्वी 40 रुपयांच्या या पातळीवर शेअर्स खरेदी करून 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची गुंतवणूक 1 लाख रुपयांवरून सुमारे 1.69 कोटी रुपयांपर्यंत वाढली असती.

अवंती फीड स्टॉक (Avanti Feeds Share Price)

अवंती फीड्सचा स्टॉक यावर्षी नॉन-परफॉर्मर राहिला आहे कारण त्याने केवळ 4.20 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. मात्र दीर्घ कालावधीत तो पेनी स्टॉकमधून दर्जेदार स्टॉकमध्ये वळला आहे. गेल्या 11 वर्षात अवंती फीड्सचा स्टॉक रु 1.60 (Avanti Feeds stock Price) वरून 542.15 रुपयांवर पोहोचला आहे. 11 वर्षांपूर्वी एखाद्याने त्यात एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ते सुमारे 3.38 कोटी रुपये झाले असते.

22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक काय? 22 Karat सोन्याला का म्हणतात 916 Gold

एस्ट्रल लिमिटेड स्टॉक किंमत (Astral Limited Stock Price)

यावर्षी मल्टीबॅगर शेअर्स त्यांच्या भागधारकांना उत्कृष्ट परतावा देत आहेत. यात एस्ट्रल लिमिटेड स्टॉक देखील समाविष्ट आहे. Astral Limited स्टॉक सध्या 2148.45 वर (Astral Limited Share Price) ट्रेडिंग करत आहे. जर आपण त्याचा एक दशक मागे जाण्याचा इतिहास पाहिला, तर एप्रिल 2010 मध्ये तो प्रति शेअर स्तर सुमारे 12 होता. या 11 वर्षांच्या कालावधीत, Astral Limited च्या स्टॉकमध्ये जवळपास 179 पट वाढ झाली आहे. तर, एखाद्या गुंतवणूकदाराने 11 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.79 कोटी रुपये झाले असते.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market