Home /News /money /

Multibagger Share : 'या' एनर्जी स्टॉकमध्ये जानेवारीत 140 टक्के रिटर्न, आता गुंतवणूक करावी का?

Multibagger Share : 'या' एनर्जी स्टॉकमध्ये जानेवारीत 140 टक्के रिटर्न, आता गुंतवणूक करावी का?

Zodiac Energy Limited ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी क्लीन एनर्जी सोल्युशन कंपनी आहे. NSE डेटानुसार त्याचे बाजार भांडवल (Market Cap) 210 कोटी आहे आणि सध्या 143.90 या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर ट्रेड करत आहे.

    मुंबई, 27 जानेवारी : नवीन वर्ष 2022 सुरू झाल्यापासून एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, अनेक स्मॉल-कॅप शेअर्सनी (Small Cap Share) त्यांच्या शेअर होल्डर्सना मल्टीबॅगर परतावा (Multibagger Return) दिला आहे. भारतीय शेअर बाजारात (Share Market) आठवडाभराहून अधिक काळ कमजोरी असतानाही अशी कामगिरी काही शेअर्सनी केली आहे. जोडिअॅक एनर्जी (Zodiac Energy) शेअर्स त्यापैकी एक आहेत. हा एनर्जी शेअर 31 डिसेंबर 2021 रोजी NSE वर 60.05 रुपयांच्या बंद किंमतीवरून आज NSE वर 143.90 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्याने 2022 मध्ये 140 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. जोडिअॅक एनर्जी शेअरची प्राईज हिस्ट्री गेल्या 5 सेशनमध्ये, 2022 चा हा मल्टीबॅगर स्टॉक 118.45 रुपयांवरून 143.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 21.50 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. NSE वर 31 डिसेंबर 2021 रोजी स्टॉक 60.05 वर बंद झाला आणि आज तो 143.90 रुपयांपर्यंत वाढला आहे, याचा अर्थ हा स्टॉक 2022 मधील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. Gold Price Today: आज सोने दरात मोठी घसरण, स्वस्तात खरेदीची संधी; पाहा 10 ग्रॅमचा लेटेस्ट रेट 2021 मध्येही हा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 49.50 रुपयांवरून 143.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. यावेळी सुमारे 190 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 32.10 रुपयांवरून 143.90 रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामध्ये या अल्प कालावधीत सुमारे 350 टक्के वाढ झाली आहे. Zodiac Energy Limited ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी क्लीन एनर्जी सोल्युशन कंपनी आहे. NSE डेटानुसार त्याचे बाजार भांडवल (Market Cap) 210 कोटी आहे आणि सध्या 143.90 या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर ट्रेड करत आहे. त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक प्रति शेअर 32.10 रुपये आहे. NSE वर जोडिअॅक एनर्जी शेअर्सचे आजचे ट्रेडिंग व्हॉल्यूम 6,036 आहे. 'बी' गटाच्या लिस्टिंग स्टॉकची बूक व्हॅल्यू 19.12 रुपये प्रति शेअर आहे तर त्याचे 20 दिवसांचे सरासरी प्रमाण 78151 आहे. तुमच्या कामाची बातमी! जाणून घ्या कोणत्या Ration Card वर किती मिळतं धान्य तुम्ही आता गुंतवणूक करावी का? शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा मल्टीबॅगर स्टॉक 'सर्किट टू सर्किट' ट्रेडिंग स्टॉक आहे आणि सध्याच्या पातळीवर नवीन पोझिशन्स टाळले पाहिजेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या