मराठी बातम्या /बातम्या /मनी /एक रुपयाहून कमी किंमतीचा स्टॉक पोहोचला 52 रुपयांवर; एका लाखाचे झाले 65 लाख!

एक रुपयाहून कमी किंमतीचा स्टॉक पोहोचला 52 रुपयांवर; एका लाखाचे झाले 65 लाख!

सिम्प्लेक्स पेपर्सचा (Simplex Papers) स्टॉकही असाच मल्टिबॅगर ठरला. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 6,406 टक्क्यांचा परतावा (Simplex Papers stock returns) दिला आहे.

सिम्प्लेक्स पेपर्सचा (Simplex Papers) स्टॉकही असाच मल्टिबॅगर ठरला. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 6,406 टक्क्यांचा परतावा (Simplex Papers stock returns) दिला आहे.

सिम्प्लेक्स पेपर्सचा (Simplex Papers) स्टॉकही असाच मल्टिबॅगर ठरला. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 6,406 टक्क्यांचा परतावा (Simplex Papers stock returns) दिला आहे.

  मुंबई, 4 डिसेंबर : कित्येक वेळा अगदी छोटे वाटणारे स्टॉक्सदेखील (Penny Stocks) भरमसाठ कमाई करून देतात. अशा स्टॉक्सना मल्टिबॅगर स्टॉक्स (Multibagger stocks) म्हणून ओळखलं जातं. सिम्प्लेक्स पेपर्सचा (Simplex Papers) स्टॉकही असाच मल्टिबॅगर ठरला. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 6,406 टक्क्यांचा परतावा (Simplex Papers stock returns) दिला आहे.

  3 डिसेंबर 2020 रोजी सिम्प्लेक्स पेपर्सच्या एका शेअरची (Simplex Papers share price) किंमत 0.80 रुपये होती. अवघ्या एका वर्षानंतर, म्हणजेच 3 डिसेंबर 2021 रोजी याचीच किंमत तब्बल 52.05 रुपये एवढी नोंदवण्यात आली. म्हणजेच, गेल्या वर्षी जर कुणी सिम्प्लेक्स पेपर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याची किंमत आज 65.05 लाख रुपये (Penny Stock turned Multibagger) झाली असती. यादरम्यान सेन्सेक्स 29.82 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 21 सेशन्समध्ये मायक्रोकॅप स्टॉक हा 169.69 टक्क्यांनी वर गेला आहे. शुक्रवारी (3 डिसेंबर) 4.94 टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर 52.05 रुपयांवर उघडला आणि दिवसभर साधारण 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये राहिला.

  फर्मची मार्केट कॅपही वाढली

  सिम्प्लेक्स पेपर्सचा स्टॉक हा 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. या फर्मची मार्केट कॅपही (Simplex Papers market Cap) वाढून 15.62 कोटी रुपये झाली. सिम्प्लेक्स पेपर्सच्या एकूण 18,000 शेअर्सनी शुक्रवारी बीएसईवर 9.30 लाख रुपयांची उलाढाल केली. सप्टेंबर 2021 तिमाहीच्या शेवटी कंपनीच्या 13 प्रमोटर्सकडे कंपनीचा 72.05 टक्के भाग, म्हणजेच 21.62 लाख शेअर्स होते. सार्वजनिक शेअर होल्डर्सकडे कंपनीचा 27.95 टक्के भाग, म्हणजेच 8.38 लाख शेअर्स होते.

  ATM Cash withdrawal: 'या' तारखेपासून ATMमधून पैसे काढणं होणार महाग

  या वर्षाच्या सुरुवातीपासून 5814 टक्क्यांनी वर गेला शेअर

  सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी कंपनीच्या एकूण 5,047 सार्वजनिक शेअर होल्डर्सकडे 2 लाख रुपयांपर्यंत किमतीचे वैयक्तिक शेअर्स होते. तसंच या शेअर होल्डर्सकडे एकूण 3.76 लाख शेअर्स किंवा कंपनीची 12.54 टक्के भागीदारी होती. गेल्या तिमाहीमध्ये कोणत्याही शेअर होल्डर्सकडे 2 लाखांहून अधिक किमतीचे वैयक्तिक शेअर्स नव्हते. एका म्युच्युअल फंडकडे कंपनीचे 102 शेअर्स होते, तर सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी एलआयसीकडे फर्मचे 3.87 लाख शेअर्स म्हणजेच एकूण 12.91 टक्के भागीदारी होती.

  21 डिसेंबर 2020 ला हा शेअर 52 आठवड्यांमधील सर्वांत कमी किमतीवर, म्हणजेच 0.84 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर एका महिन्यातच हा शेअर 157.04 टक्क्यांनी वर आला. जानेवारी 2021 नंतर डिसेंबरपर्यंत या शेअरमध्ये तब्बल 5814 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

  Gold Price: लग्नसराईत सोनं खरेदी करताय? जाणून घ्या काय आहे गोल्ड रेट

  स्टॉकबद्दल इतर माहिती

  शेअर प्राइसमध्ये वाढ होत असली, तरी विक्रीच्या बाबतीत या स्टॉकचं प्रदर्शन तितकेसं चांगलं नाही. मार्च 2017 च्या तिमाहीनंतर या फर्मने शून्य विक्री नोंदवली आहे. त्यापूर्वी 2016 च्या डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये या फर्मने 0.08 कोटी रुपयांची विक्री नोंदवली होती.

  दरम्यान, इतर पेपर कंपन्यांचं प्रदर्शन या स्टॉकच्या तुलनेत तेवढं खास नाहीये. एका वर्षामध्ये आंध्र पेपर्सच्या शेअरमध्ये 11.93 टक्के वाढ दिसून आली, तर ओरिएंट पेपर्सच्या शेअरमध्ये 61 टक्क्यांची वाढ दिसून आली. याच कालावधीमध्ये वापी पेपर मिल्सच्या शेअरमध्ये 42.64 टक्क्यांची घट दिसून आली. अजिओ पेपर लिमिटेडच्या स्टॉकमध्ये गेल्या वर्षभरात 345.65 टक्क्यांची रॅली दिसून आली.

  First published:
  top videos

   Tags: Investment, Share market