मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger stock: 1.51 रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केलं करोडपती, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Multibagger stock: 1.51 रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केलं करोडपती, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

पेनी स्टॉक असणाऱ्या आरती इंडस्ट्री ((Aarti Industries) च्या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. हा केमिकल स्टॉक त्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये समाविष्ट होत आहे, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे.

पेनी स्टॉक असणाऱ्या आरती इंडस्ट्री ((Aarti Industries) च्या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. हा केमिकल स्टॉक त्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये समाविष्ट होत आहे, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे.

पेनी स्टॉक असणाऱ्या आरती इंडस्ट्री ((Aarti Industries) च्या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. हा केमिकल स्टॉक त्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये समाविष्ट होत आहे, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: तुम्हाला देखील शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही  पेनी स्टॉक (What is Penny stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. हे स्टॉक खूप स्वस्त (Investment in Penny Stock) असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी आहे. या शेअर्सची किंमत साधारणपणे ₹25 च्या खाली असते, ज्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी खूप आकर्षक ठरतात, गुंतवणूकदार यात मालामाल देखील होतात, मात्र या शेअर्समध्ये जोखीम तितकीच जास्त आहे. यात गुंतवणूक करताना संयमाची आवश्यकता असते. असाच एक पेनी स्टॉक असणाऱ्या आरती इंडस्ट्री (Aarti Industries) च्या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. हा केमिकल स्टॉक त्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये समाविष्ट होत आहे, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे.

NSE वर 28 नोव्हेंबर 2001 रोजी आरती इंडस्ट्रीच्या या शेअरची किंमत 1.51 रुपये होती, जी 18 नोव्हेंबर 2021 रोजी 972.20 रुपयांवर बंद झाली आहे. या कालावधीत स्टॉक सुमारे 650 पट वाढला आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून शेअर विक्रीचा दबाव आहे.

हे वाचा-PM Kisan अंतर्गत ₹2000 नाही तर मिळणार ₹4000? यासह मिळतील हे 3 मोठे फायदे

आरती इंडस्ट्रीजच्या शेअरची प्राइस हिस्ट्री

आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सचा इतिहास (Aarti Industries share price history) पाहता गेल्या एका महिन्यात आरती इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 1021 रुपयांवरून 972.20 रुपये प्रति शेअरपर्यंत घसरली आहे. या कालावधीत सुमारे 5 टक्के घट झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स सुमारे 832 रुपयांवरून 972.20 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत सुमारे 16 टक्के वाढ झाली आहे. आतापर्यंत एका वर्षात हा स्टॉक 630 रुपयांवरून 972.20 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 55 टक्के परतावा दिला आहे.

गेल्या वर्षभरात हा केमिकल स्टॉक 567 रुपयांवरून 972 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 71 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षात आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. हा शेअर 181.28 रुपयांवरून 972.20 रुपयांपर्यंत वाढला. या कालावधीत सुमारे 435 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 20 वर्षांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 1.51 रुपयांवरून 972.20 रुपयांपर्यंत वाढला आहे. अर्थात या कालावधीत या शेअरने सुमारे 65,000 टक्के परतावा दिला आहे.

हे वाचा-15 X 15 X 15 नियमाने बदलून जाईल तुमचं आयुष्य; कमी वेळेत व्हाल कोट्याधीश! कसं?

6.50 कोटींची कमाई

वरील शेअर प्राइस हिस्ट्रीनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याच्या 1 लाख रुपयांचे आज 95,000 रुपये झाले असते. अर्थात या महिन्याच्या कालावधीत गुंतवणूकदाराला काहीसा तोटा सहन करावा  लागला असेल. मात्र जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम आज त्याची 1.16 लाख झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज ते 1 लाख रुपये 1.71 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची रक्कम आज 5.35 लाख रुपये झाली असती. तथापि, एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची रक्कम 6.50 कोटी रुपये झाली असती.

First published:

Tags: Money, Share market