Home /News /money /

Multibagger Share : मस्तच! 'हा' स्टॉक ठरला मल्टिबॅगर; एक लाख रुपयांचे झाले 15 लाख

Multibagger Share : मस्तच! 'हा' स्टॉक ठरला मल्टिबॅगर; एक लाख रुपयांचे झाले 15 लाख

Kwality Pharmaceuticals ltd कंपनीच्या स्टॉकमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी मार्चमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक करून सुमारे 2000 शेअर्स खरेदी केले असतील, तर आज त्यांची किंमत 15,58,000 रुपये झाली आहे.

मुंबई, 17 जानेवारी : भारतीय शेअर बाजाराने ( Indian stock markets) गेल्या वर्षात विविध आव्हानांचा सामना करून विक्रमी उच्चांक गाठला. कोरोना महामारीनंतरही शेअर बाजाराने (Share Market Investment) असे काही मल्टिबॅगर स्टॉक (Multibagger Stock) आणि पेनी स्टॉक्स (Penny Stock) दिले आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार हे मालामाल झाले आहेत. या स्टॉक्सनी कमी वेळेत इतका रिटर्न (Return) दिला आहे, की त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. चांगला रिटर्न देणारे एक किंवा दोन शेअर्स नाहीत, तर जवळपास डझनभर असे शेअर्स आहेत, जे बाजारातल्या सर्व चढ-उतारानंतरही गुंतवणूकदारांना (Investors) चांगले रिटर्न देण्यात यशस्वी ठरले. क्वालिटी फार्मास्युटिकल्स (Kwality pharmaceuticals ltd) हा असाच एक मल्टिबॅगर ठरलेला स्टॉक आहे. या पेनी स्टॉकचं मूल्य वाढण्याचा सुरुवातीचा वेग खूपच कमी होता; पण जेव्हा त्याचं मूल्य वाढण्यास सुरुवात झाली, तेव्हा तो मल्टिबॅगर स्टॉक ठरलाय. क्वालिटी फार्मास्युटिकल्स शेअरची किंमत वर्षभरापूर्वी 50 रुपयांच्या आसपास होती. ती सध्या 780 रुपये आहे. त्यानुसार हिशोब केला तर एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षात 1178 टक्के रिटर्न दिलाय. Electric Vehicle संबंधित शेअर तुमचा पोर्टफोलियो चमकवू शकतात, 'या' शेअर्सवर नजर ठेवा जबरदस्त रिटर्न क्वालिटी फार्मास्युटिकल्सच्या शेअरची किंमत गेल्या वर्षी 24 मार्च रोजी 49.10 रुपये होती. यानंतर या स्टॉकची किंमत वाढत गेली व गेल्या वर्षी मे महिन्यात किंमतीने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला. नोव्हेंबर महिन्यात क्वालिटी फार्मास्युटिकल्स स्टॉक 1066 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. सध्या क्वालिटी फार्माचा शेअर 779.85 रुपयांवर ट्रेड होत आहे. याचाच अर्थ वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना या शेअरने जबरदस्त रिटर्न दिले आहेत. चहा, कॉफी प्या आणि बिल Cryptocurrency मध्ये भरा; कुठे सुरु झालीय ही सुविधा? गुंतवणूकदारांची चांगली कमाई क्वालिटी फार्मास्युटिकल्स कंपनीच्या स्टॉकमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी मार्चमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक करून सुमारे 2000 शेअर्स खरेदी केले असतील, तर आज त्यांची किंमत 15,58,000 रुपये झाली आहे. म्हणजेच वर्षभरातच एक लाख रुपयांचे 15 लाख रुपये झाले. गेल्या 6 महिन्यांत हा फार्मा स्टॉक 183 रुपयांवरून 779.85 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत सुमारे 320 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे आज सुमारे 4.30 लाख रुपये झालेत. गेल्या दोन वर्षांच्या रिटर्नचा अभ्यास केल्यास, 26 डिसेंबर 2019 रोजी त्याची बीएसईवर (BSE) किंमत 25.55 रुपये होती. ती आता 779.85 रुपये आहे. या 2 वर्षांत या स्टॉकची किंमत सुमारे 2900 टक्क्यांनी वाढली आहे. या 2 वर्षांच्या कालावधीत तो जवळपास 30 पट वाढला. शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य स्टॉक निवडणं हे मोठं कठीण काम आहे; पण असे काही स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत मोठी कमाई करून दिली आहे. क्वालिटी फार्मास्युटिकल्स कंपनीचा स्टॉक तसाच ठरला आहे.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या