Home /News /money /

KPIT Tech शेअरमुळे गुंतवणूकदारांनी संपत्ती तिप्पट, वर्षभरात 300 टक्के परतावा

KPIT Tech शेअरमुळे गुंतवणूकदारांनी संपत्ती तिप्पट, वर्षभरात 300 टक्के परतावा

एका वर्षापूर्वी KPIT Technologies Limited या स्टॉकमध्ये (Multibagger Stock) गुंतवलेली 5 लाख रुपयांची रक्कम आज 21.7 लाख रुपये झाली असती. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याचा स्टॉक सुमारे 182 टक्क्यांनी वाढला आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी (Share Market Investors) जर वर्षभरापूर्वी KPIT Technologies Limited च्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर आता त्यांना मोठा परतावा मिळू शकतो. केपीआयटी टेक्नॉलॉजीजच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात आपल्या भागधारकांना 300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. बुधवारी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेअर 10 टक्क्यांनी वाढून 410.45 रुपयांवर पोहोचला. गेल्या सात दिवसांपासून त्यात वाढ होत असून याच काळात ती 30 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या एका वर्षात, शेअरची किंमत 94.5 रुपयांवरून 410.45 रुपयांपर्यंत वाढली, या कालावधीत सुमारे 334 टक्के परतावा मिळाला आहे. PolicyBazaar IPO Refund: शेअरही नाही मिळाले आणि पैसेही रिफंड नाही झाले? स्टेटस कसं तपासणार? गुंतवणूकदारांना दमदार परतवा एका वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Multibagger Stock) गुंतवलेली 5 लाख रुपयांची रक्कम आज 21.7 लाख रुपये झाली असती. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्याचा स्टॉक सुमारे 182 टक्क्यांनी वाढला आहे. 11,000 कोटींहून अधिक बाजार भांडवलासह, समभाग 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेड करत आहेत. Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या 6 गोष्टी, मिळेल योग्य फायदा KPIT टेकने सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत 65 कोटींचा नफा नोंदवला आहे. मागील वर्षीच्या तिमाहीत हा नफा 27.8 कोटी होता. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ महसूल 22 टक्क्यांनी वाढून 590.87 कोटी रुपये झाला आहे. या स्टॉकने आधीच प्रति शेअर 400 रुपयांचे टार्गेट ओलांडले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या