Home /News /money /

Multibagger Share: शेअर बाजारातील पडझडीतही एका शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात 958 टक्के परतावा

Multibagger Share: शेअर बाजारातील पडझडीतही एका शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात 958 टक्के परतावा

Gensol Engineering च्या शेअरने एका वर्षात 958 टक्के परतावा दिला आहे, तर यावर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 386 टक्के परतावा दिला आहे.

    मुंबई, 28 जून : शेअर बाजारात (Share Market) सध्या सुरू असलेल्या पडझडीच्या दरम्यान असा एक शेअर आहे ज्याने गेल्या 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना (Investors) 950 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तसेच 2022 मध्ये या स्टॉकमध्ये 380 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Gensol Engineering असं या शेअरचे नाव आहे. गेल्या वर्षभरात हा स्टॉक 54 रुपयांवरुन 579 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना एकूण 958 टक्के नफा मिळाला आहे. तर यादरम्यान सेन्सेक्स (Sensex) केवळ 0.81 टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरने 579 रुपयांची 52 आठवड्यांची सर्वोत्तम पातळी देखील गाठली आहे. Shapoorji Pallonji ग्रुपचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांचे 93व्या वर्षी निधन शेअर प्राईज हिस्ट्री Gensol Engineering च्या शेअरने एका वर्षात 958 टक्के परतावा दिला आहे, तर यावर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 386 टक्के परतावा दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी हा शेअर 119 रुपयांवर व्यवहार करत होता. विशेष म्हणजे या काळात सेन्सेक्स 10 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी हा शेअर 68 रुपयांवर ट्रेंड करत होता. तेव्हापासून गुंतवणूकदारांना 746 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी गेल्या 1 महिन्यात यात 63 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. एकूणच या शेअरने सेन्सेक्सला सातत्याने मागे टाकले आहे. गुंतवणूकदारांची किती कमाई झाली? जर एखाद्या गुंतवणूकदाराने ऑगस्ट 2021 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ते आता 11 लाखांपेक्षा जास्त झाले असते. याशिवाय, जर एखाद्याने गेल्या 6 महिन्यांत यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ते 10 लाखांपेक्षा जास्त झाले असते. एका माशामुळे मच्छिमाराचं नशीब पालटलं; 3 तास चाललेल्या बोलीनंतर एवढा महाग विकला गेला एक मासा कंपनीचा व्यवसाय Gensol Engineering कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात 153 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, जे 2020-21 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 155 टक्के अधिक आहे. या कालावधीत कंपनीने 11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या 4 वर्षात कंपनीने नफ्यात 200 टक्के वाढ नोंदवली आहे. Gensol भारत आणि परदेशातील सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी इंटीग्रेशन आणि कन्सल्टन्सी सेवा प्रोव्हाईड करते. कंपनीची स्थापना 2012 मध्ये झाली. कंपनीकडे सोलार प्रोजेक्ट इंजिनीअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कौशल्य आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या