मराठी बातम्या /बातम्या /मनी /Multibagger Stock: अडीच वर्षात 35 पैशांचा शेअर 146 रुपयांवर, गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 4 कोटी

Multibagger Stock: अडीच वर्षात 35 पैशांचा शेअर 146 रुपयांवर, गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 4 कोटी

Flomic global logistics या स्टॉकची किंमत दोन वर्षांपूर्वी BSE वर फक्त 35 पैसे होती. जी आता वाढून 143.25 रुपये प्रति शेअर झाली आहे. दोन वर्षांत यात 409 पट वाढ झाली आहे.

Flomic global logistics या स्टॉकची किंमत दोन वर्षांपूर्वी BSE वर फक्त 35 पैसे होती. जी आता वाढून 143.25 रुपये प्रति शेअर झाली आहे. दोन वर्षांत यात 409 पट वाढ झाली आहे.

Flomic global logistics या स्टॉकची किंमत दोन वर्षांपूर्वी BSE वर फक्त 35 पैसे होती. जी आता वाढून 143.25 रुपये प्रति शेअर झाली आहे. दोन वर्षांत यात 409 पट वाढ झाली आहे.

मुंबई, 14 नोव्हेंबर : गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात शेअर्सनी त्यांच्या शेअर होल्डर्सना मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Return) दिले आहे. 2021 मधील मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीमध्ये केवळ स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅप दर्जेदार स्टॉक्स नाहीत. त्यात काही पेनी स्टॉकचाही समावेश आहे. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक (Flomic Global Logistics Ltd) स्टॉक. मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या यादीत त्याचा समावेश आहे.

या स्टॉकची किंमत दोन वर्षांपूर्वी BSE वर फक्त 35 पैसे होती. जी आता वाढून 143.25 रुपये प्रति शेअर झाली आहे. दोन वर्षांत यात 409 पट वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर तो आज करोडपती झाला असता.

Flomic Global Logistics शेअरची किंमत

गेल्या सहा महिन्यांत फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत 7.62 रुपयांवरून 143.25 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत शेअरची किंमत सुमारे 1,780 टक्क्यांनी वाढली आहे. 2021 मध्ये शेअर 1.95 रुपयांवरून 143.25 रुपयांपर्यंत वाढला, ज्यामुळे त्याच्या गुंतवणूकदारांना सुमारे 7,245 टक्के परतावा मिळाला.

SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?

एका वर्षात 11640 टक्के परतावा

गेल्या एका वर्षात फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत प्रति शेअर 1.22 रुपयांवरून 143.25 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कालावधीत सुमारे 11,640 टक्के वाढ नोंदवली गेली. तर

28 मार्च 2019 रोजी स्टॉक 0.35 पैशांवर वर बंद झाला आणि शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 रोजी स्टॉक 143.25 वर बंद झाला. या कालावधीत त्यात 40,830 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुमारे अडीच वर्षांतील या मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा All time High 216.30 रुपये आहे.

राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण 

गुंतवणूकदार मालामाल

Flomik Global Logistics च्या स्टॉकमध्ये, ज्याने 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले होते, आज त्याचे 1 लाख रुपये 18.80 लाख झाले आहेत. दुसरीकडे, एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.17 कोटी झाले असते. त्याचप्रमाणे, गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये प्रति शेअर 35 पैसे असताना गुंतवले असते तर आज ते 4.09 कोटी रुपये झाले असते.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market