• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Multibagger Share : 20 रुपयांचा 'हा' शेअर 9985 रुपयांवर, गुंतवणूकदारांचे 20 हजार बनले एक कोटी!

Multibagger Share : 20 रुपयांचा 'हा' शेअर 9985 रुपयांवर, गुंतवणूकदारांचे 20 हजार बनले एक कोटी!

भारत रसायन शेअर्सची किंमती, गेल्या 6 महिन्यांत 12682 वरून 9985 प्रति शेअरपर्यंत घसरली आहे. या कालावधीत सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र मागील एका वर्षात, मल्टीबॅगरचा स्टॉक सुमारे 8,710 वरून 9985 पर्यंत वाढला आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : स्टॉकमध्ये गुंतवणूक (Share Market Investment) करणे म्हणजे त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करणे. एखादा व्यापारी आपला व्यवसाय अनेकदा बदलत नाही म्हणून, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना देखील सल्ला दिला जातो की त्यांनी शक्य तितक्या जास्त वेळ स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी. बाजारातील तज्ज्ञांच्या (Share Market Experts) मते, शेअर बाजारातील गुंतवणूकदार बिझनेस मॉडेल आणि भविष्यात त्या व्यवसायाचा अपेक्षित परतावा लक्षात घेऊन दर्जेदार स्टॉक्स निवडतो. गुंतवणुकदाराने स्टॉकमध्ये पैसे तोवर गुंतवले पाहिजेत जोपर्यंत त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कारणे आहेत. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदाराचा संयम. भारत रसायनाचे (Bharat Rasayan Share) शेअर्स हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. गेल्या 20 वर्षांत हा केमिकल शेअर 20 रुपयांवरून सुमारे 9895 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोहेचला आहे. या कालावधीत जवळपास 500 पट या शेअरची किंमत वाढली आहे. भारत रसायन शेअर्सची किंमती, गेल्या 6 महिन्यांत 12682 वरून 9985 प्रति शेअरपर्यंत घसरली आहे. या कालावधीत सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र मागील एका वर्षात, मल्टीबॅगरचा स्टॉक सुमारे 8,710 वरून 9985 पर्यंत वाढला आहे, ज्यामुळे त्याच्या शेअरहोल्डर्सना सुमारे 15 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षांत भारत रसायनाच्या शेअरची किंमत 1910 वरून 9985 पर्यंत वाढली आहे, जी या काळात सुमारे 425 टक्क्यांनी वाढली आहे. कमी पगारामुळे लग्नासाठी मुलींनी दिला होता नकार; आता आहे अब्जाधीश 10 वर्षांचा विचार केला तर भारत रसायन शेअरची किंमत प्रति शेअर 110 रुपयांवरून 9985 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत त्याच्या शेअरहोल्डर्सना 8975 टक्के परतावा मिळाला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 20 वर्षांत, या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत प्रति शेअर 20 वरून 9985 पर्यंत वाढली आहे, जी या कालावधीत जवळजवळ 500 पट वाढली आहे. खेडेगावातल्या तरुणाला इंग्रजीही येत नव्हतं; असा उभारला Paytm चा डोलारा अन्.. गुंतवणूकदार मालामाल जर तुम्ही भारत रसायन शेअर्सच्या किमतीचा इतिहास पाहिला तर, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी भारत रसायनाच्या शेअर्समध्ये 20,000 रुपये गुंतवले असते, तर त्याचे 20,000 रुपये आज 16,000 रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 20,000 ची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 20,000 आज 23,000 झाले असते. त्याचप्रमाणे, जर गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या रासायनिक स्टॉकमध्ये 20,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1.05 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 20,000 ची गुंतवणूक केली असेल आणि 110 रुपयांच्या लेव्हलवर शेअर खरेदी केला असेल तर त्याचे 20,000 आज 18.15 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी भारत रसायनाच्या शेअर्समध्ये 20,000 ची गुंतवणूक केली असती, तर त्याचे 20,000 आज 1 कोटी झाले असते.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: