मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger share: गुंतवणूकदार मालामाल; 'या' शेअरमुळे एक लाखांची गुंतवणूक बनली 6 कोटी रुपये

Multibagger share: गुंतवणूकदार मालामाल; 'या' शेअरमुळे एक लाखांची गुंतवणूक बनली 6 कोटी रुपये

UPL Limited आणि Lupin Limited हे ते शेअर्स आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी या दोन शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती, तर तो आत्तापर्यंत करोडपती झाला असता.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 7 ऑगस्ट : शेअर मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत ज्यांनी दीर्घ मुदतीत मजबूत परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित केले आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा दोन शेअर्सबद्दल सांगत आहोत, ज्यांनी 20 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहेत. UPL Limited आणि Lupin Limited हे ते शेअर्स आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी या दोन शेअर्समध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती, तर तो आत्तापर्यंत करोडपती झाला असता. चला जाणून बघुया कसं? Online Shoppingवर होईल मोठी बचत, 'या' खास क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहेत विविध ऑफर्स शेअर किंमत UPL Limited चे शेअर्स 5 जुलै 2002 रोजी 1.20 रुपये ते 5 ऑगस्ट 2022 रोजी 742.50 रुपयांपर्यंत वाढले आहेत. म्हणजेच गेल्या 20 वर्षात 61,775.00 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तर Lupin Limited चे शेअर्स 8 जानेवारी 1999 रोजी 2.33 रुपयांवरून 5 ऑगस्ट 2022 रोजी 669.40 रुपयांपर्यंत वाढले. म्हणजेच गेल्या 23 वर्षात या शेअरने तब्बल 28,629.61 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. बँक बुडाली तर तुमचे किती पैसे परत मिळतात? बदललेला नियम समजून घ्या रक्कम समजून घ्या 20 वर्षांपूर्वी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने यूपीएल लिमिटेडच्या शेअरमध्ये 1.20 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असता. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 23 वर्षांपूर्वी Lupin Ltd च्या शेअर्समध्ये 2.33 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 2.87 कोटी रुपये झाली असती.
First published:

Tags: Money, Share market

पुढील बातम्या