मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Share: 9 रुपयांचा शेअर 3700 रुपयांवर, गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 4 कोटी

Multibagger Share: 9 रुपयांचा शेअर 3700 रुपयांवर, गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 4 कोटी

Divi's Lab ही फार्मा क्षेत्रातील मोठी कंपनी असून तिचे मार्केट कॅप 98,972 रुपये कोटी आहे. एवढेच नाही तर कंपनीची उत्पादने 95 देशांमध्ये निर्यात केली जातात.

    मुंबई, 16 आगस्ट : शेअर बाजारात संयमाने पैसा कमावला जाऊ शकतो. या जोखमीच्या बाजारात तुम्ही योग्य वेळ आणि स्टॉक निवडलात तर तुम्ही पटकन करोडपती व्हाल. अनेक शेअर विक्रीच्या दबावातही उत्तम परतावा देतात. असाच एक स्टॉक Divi's Laboratory Ltd. ज्याने अवघ्या काही वर्षांत उत्कृष्ट परतावा दिला आहे. हा शेअर 19 वर्षांपूर्वी 9 रुपये प्रति शेअर होता, तर आज तो 3,721 रुपयांवर व्यवहार करत आहे. म्हणजेच 19 वर्षात 41,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. दिवीज लॅबोरेटरीज लि.ने गुंतवणूकदारांना इतका मजबूत परतावा दिला आहे की जर 19 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये कुणी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची गुंतवणूक 4.13 कोटी रुपये झाली असती. टाटा समूहाच्या 'या' शेअरमुळे काही गुंतवणूकदार मालामाल तर काहींचं मोठं नुकसान, वर्षभरात नेमकं काय घडलं? कंपनी काय करते? Divi's Lab ही फार्मा क्षेत्रातील मोठी कंपनी असून तिचे मार्केट कॅप 98,972 रुपये कोटी आहे. एवढेच नाही तर कंपनीची उत्पादने 95 देशांमध्ये निर्यात केली जातात. म्हणजेच जागतिक स्तरावर कंपनीची बाजारपेठ मजबूत आहे. अक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स बनवणाऱ्या जगातील 3 मोठ्या कंपन्यांमध्ये कंपनीचे नाव समाविष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार ही कंपनी सध्या पूर्णपणे कर्जमुक्त आहे. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी SBI ची खास योजना, फिक्स डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याजदर स्टॉकची प्राईज हिस्ट्री? शुक्रवारी शेअर बाजारात शेअर 3,721.10 रुपयांवर बंद झाला. 13 मार्च 2003 रोजी हा शेअर 9 रुपयांवर लिस्ट झाला होता, तर आज तो 3,721 रुपयांवर आहे. म्हणजेच शेअरने 41,245.56 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात त्यात 24.04 टक्क्यांची घट झाली आहे. पण त्यानंतर या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. NSE वर या शेअरने 18 ऑक्टोबर 2021 रोजी 5,425.10 चा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 26 मे 2022 रोजी 52 आठवड्यांचा नीचांक गाठला, जो 3,365.55 रुपये आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या