मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Stock: 3 महिन्यात दिला 1200 टक्क्यांचा बंपर रिटर्न! 1 लाखाचे बनले 13 लाख

Multibagger Stock: 3 महिन्यात दिला 1200 टक्क्यांचा बंपर रिटर्न! 1 लाखाचे बनले 13 लाख

 या वर्षात अनेक स्टॉक मल्टीबॅगर बनले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना भरभक्कम रिटर्न मिळाला आहे. हा स्टॉक आहे 3i Infotech चा, या पेनी स्टॉकने गेल्या 3 महिन्यात 1200 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसात शेअर मार्केटमध्ये घसरण होत असली तरी या वर्षभरात भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न (Indian Share Market) मिळाला आहे. या वर्षात अनेक स्टॉक मल्टीबॅगर बनले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांना भरभक्कम रिटर्न मिळाला आहे. हा स्टॉक आहे 3i Infotech चा, या पेनी स्टॉकने गेल्या 3 महिन्यात 1200 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.

Mint मधील वृत्तानुसार, या मल्टीबॅगर पेनी स्टॉकची (Multibagger Penny Stock) प्राइस हिस्ट्री (3i Infotech share Price) तपासली तर, गेल्या पाच दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये 5 या शेअरने 5 अप्पर सर्किट दिले आहेत. गेल्या पाच दिवसात या शेअरमध्ये 21.5 टक्के वृद्धी झाली आहे. जर आपण एका महिन्याचा विचार केला तर हा पेनी स्टॉक 35.85 रुपयांवरुन 108.50 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. हा रिटर्न जवळपास 200% आहे.

हे वाचा-डिसेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

गेल्या 3 महिन्यांचा विचार केला, तर हा स्टॉक सुरुवातीला 8.48 रुपये प्रति शेअरवर होता.  27 ऑगस्ट 2021 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 3i इन्फोटेकची किंमत ₹9 देखील नव्हती. 26 नोव्हेंबर रोजी जेव्हा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली, तेव्हाही या शेअरने आपला कल बदलला नाही. हा शेअर आता ₹ 108.50 वर व्यवहार करत आहे. टक्केवारीत हा रिटर्न 1200% आहे.

1 लाख ते 13 लाख

3i इन्फोटेकने आपल्या गुंतवणूकदारांना अनेक पटीने परतावा दिला आहे. जर तुम्ही 1 आठवड्यापूर्वी त्यात ₹ 1 लाख ठेवले असते, तर ते आता ₹ 1.21 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने महिन्यापूर्वी यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्या एक लाखाचे आतापर्यंत ₹3 लाखा झाले असते. जर आपण 3 महिन्यांच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर, तर 3 महिन्यांपूर्वी जर कोणी या स्टॉकमध्ये ₹1 लाख  रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे आज 13 लाख रुपये झाले असते.

हे वाचा-सलग 3 वर्ष डिसेंबर महिन्यात या 8 शेअर्समध्ये येते 10% पेक्षा जास्त तेजी

(डिस्क्लेमर: आम्ही तुम्हाला हा स्टॉक फक्त माहितीसाठी सांगत आहोत. यामध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केलेली नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)

First published:

Tags: Money, Share market