'मायक्रोसॉफ्ट- RIL भागीदारीसाठी आम्ही उत्सुक', मुकेश अंबानी आणि सत्या नडेला यांचा संवाद

'मायक्रोसॉफ्ट- RIL भागीदारीसाठी आम्ही उत्सुक', मुकेश अंबानी आणि सत्या नडेला यांचा संवाद

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी, मायक्रोसॉफ्ट आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची भागीदारी निर्णायक ठरेल, असं म्हटलं आहे. मुंबईमधल्या फ्युचर डिकोडेड सीईओ 2020 या परिषदेत मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांच्याशी झालेल्या संवादामध्ये त्यांनी या भागीदारीवर भर दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी, मायक्रोसॉफ्ट आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची भागीदारी निर्णायक ठरेल, असं म्हटलं आहे.

मुंबईमधल्या फ्युचर डिकोडेड सीईओ 2020 या परिषदेत (Future Decoded CEO 2020 Summit)मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांच्याशी झालेल्या संवादामध्ये त्यांनी या भागीदारीवर भर दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावरही मुकेश अंबानी यांनी टिप्पणी केली. ट्रम्प जो भारत बघणार आहेत तो भारत मागच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी बघितलेल्या भारतापेक्षा वेगळा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Jio चं योगदान

भारतात आमच्याकडे एक प्रमुख डिजिटल समाज बनण्याची संधी आहे. भारतात उद्यमशीलतेची विराट ताकद आहे. लवकरच आम्ही जगातल्या 3 प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक होऊ, असंही मुकेश अंबानी यांनी सांगितलं. सत्या नडेला यांच्याशी बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, भारतातलं मोबाइल नेटवर्क जगातल्या कोणत्याही मोबाइल नेटवर्कच्या बरोबरीचं किंवा चांगलंच आहे. उत्पादन क्षेत्रात भारताची चांगली प्रगती होतेय. सुरुवातीच्या दिवसांत TCS, इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांनी तंत्रज्ञानातल्या सुधारणा पुढे नेल्या.

(हेही वाचा : VIDEO : प्रोटोकॉल तोडून मोदींनी केलं ट्रम्प दांपत्याचं स्वागत)

डिजिटल इंडिया

RIL चे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला 'डिजिटल इंडिया'ची दृष्टी दिली आणि Jio च्या लाँचिंगसोबतच डिजिटल इंडियामध्ये आम्ही एक छोटंसं योगदान दिलं. Jio च्या आधी देशात डेटाची किंमत 300 रु. ते 500 रु. प्रति GB होती. Jio आल्यानंतर ही किंमत 12 ते 14 रुपये झाली. डेटाच्या वापरातही वाढ झाली आहे. डिजिटल इंडिया एक जनआंदोलन बनलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना स्टार्टअपच्या स्वरूपातच झाली होती. तेव्हा तर स्टार्टअप इंडस्ट्रीचा एवढा बोलबाला नव्हता. कोणत्याही छोट्या उद्योजकाकडे धीरूभाई अंबानी किंवा बिल गेट्स बनण्याची क्षमता असते हे आपण लक्षात घ्यायला हवं, असंही मुकेश अंबानी सत्या नडेला यांच्याशी बोलताना म्हणाले.

(हेही वाचा : ट्रम्प यांच्या तोंडी रोमँटिक DDLJ चं नाव येताच मेलेनिया यांचा चेहरा खुलला)

1 टेबल आणि 1 खुर्ची

लघु, मध्यम आणि मायक्रो उद्योग हे भारताच्या GDP चा मोठा भाग आहेत. आमच्या वडिलांनी एक टेबल, खुर्ची आणि 1 हजार रु. घेऊन रिलायन्सची स्थापना केली होती. Jio आणि मायक्रोसॉफ्ट यांच्याकडे लघु आणि मध्यम स्वरूपाचे उद्योग सक्षम करण्याची संधी आहे. याच उद्योगांचं भारताच्या निर्यातीतही 40 टक्के योगदान आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले.

======================================================================================

First published: February 24, 2020, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading