RIL आणि BP मध्ये नवा करार, 5 वर्षात उघडणार 5,500 पेट्रोल पंप

RIL, BP, Petrol Pump - रिलायन्स इंडस्ट्री आणि बीपी मिळून इंधन करार केलाय. त्याचा फायदा भारतात होणार

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 12:26 PM IST

RIL आणि BP मध्ये नवा करार, 5 वर्षात उघडणार 5,500 पेट्रोल पंप

मुंबई, 07 ऑगस्ट : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)नं ब्रिटनची पेट्रोलियम कंपनी BP पीएलसीसोबत नव्या जाॅइन्ट व्हेंचरची घोषणा केलीय. RIL, BPसोबतच्या भागीदारीनंतर देशात 5,500 पेट्रोल पंप उघडणार आहे. कंपनीच्या प्लॅनमध्ये रिटेल सर्विस स्टेशन नेटवर्कसोबत विमानाच्या इंधनाचा उद्योगही  केला जाणार आहे. याआधी दोन्ही कंपन्या 2011पासून एकत्र व्यवसाय करतायत.

सध्या RIL चे देशभरात 1400 पेट्रोल पंप

कंपनीनं सांगितलंय की, भारतात पुढच्या 20 वर्षात जगातला सर्वात मोठा इंधनाचा बाजार असेल. RIL आणि बीपी मिळून देशात 1400हून जास्त साइट्सवर RILच्या  आताच्या इंधन रिटेलिंग नेटवर्कचा समावेश करेल. 5 वर्षात 5,500 साइट्सपर्यंत विकास करण्याचं लक्ष्य आहे.

लागोपाठ सहाव्या दिवशी पेट्रोल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

यात रिलायन्सच्या हवाई इंधनाच्या उद्योगाचाही समावेश आहे. कंपनी देशातल्या 30 विमानतळांवर इंधन पुरवते. या करारानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि बीपीचे ग्रुप प्रमुख एक्झिक्युटिव्ह बाॅब डुडले यांनी सही केलीय.

Loading...

RIL-BPमध्ये इंधन रिटेलवर नवा JV

मुकेश अंबानी म्हणाले की या भागीदारीमुळे आम्ही खूश आहोत. ही भागीदारी बीपी आणि रिलायन्सच्या मजबूत संबंधांचा मापदंड आहे. ते पुढे म्हणाले की यामुळे देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सेवा वाढतीलच आणि ग्राहकांबरोबरचे आमचे संबंध आणखी घट्ट होतील.

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर कोहलीचा शोकसंदेश, क्रीडाविश्वातून श्रद्धांजली

या भागीदारीत रिलायन्सचा 51 टक्के हिस्सा

या करारात 51 टक्के भागीदारी RIL ची असेल तर 49 टक्के भागीदारी बीपीची असेल.

बीपी भारताचा मोठा गुंतवणूकदार

बीपी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाॅब डुडले यांनी सांगितलं की, 2020पर्यंत भारतात उर्जा क्षेत्राचा मोठा बाजार असेल. बीपी इथला मोठा गुंतवणूकदार आहे. इथल्या बाजारात मोठ्या संधी आहेत. आम्ही रिलायन्ससोबत भारतात गॅस स्रोत विकसित करण्यावर काम करतोय. त्याचा फायदा भारतीयांना होईल.

राज्यात पुराचा महाप्रलय! 204 गावांतून 51 हजार 785 नागरिकांचं स्थलांतर

त्यांनी सांगितलं की 2020पर्यंत नव्या भागीदारीवर काम करणं सुरू करू. ते म्हणाले केजी डी-6 प्रोजेक्ट ट्रॅकवर आहे.

बचावकार्यादरम्यान बोट उलटली अन्...पाहा श्वास रोखणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: RIL
First Published: Aug 7, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...