Article 370 : खूशखबर! जम्मू - काश्मीर आणि लडाखमध्ये उघडणार महाराष्ट्राची रिसॉर्ट्स

Article 370 : खूशखबर! जम्मू - काश्मीर आणि लडाखमध्ये उघडणार महाराष्ट्राची रिसॉर्ट्स

काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच MTDC जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये रिसॉर्ट उघडणार आहे.

  • Share this:

मुंबई, 7 ऑगस्ट : कितनी खूबसूरत ये तस्वीर है, मौसम बेमिसाल बेनज़ीर है.... ये कश्मीर है, ये कश्मीर है

काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळेच काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर ट्रॅव्हल कंपन्यांनी आनंद व्यक्त केला. आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीही जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये रिसॉर्ट उघडणार आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीच याबदद्लची माहिती दिली.

काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर आता काश्मीरचा चेहराच बदलेल, असं म्हटलं जातं. अर्थात काश्मीरमध्ये बाहेरच्या व्यक्तीला जमीन घेता यावी यासाठीची कायदेशीर प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची आहे.

जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशात उपराज्यपालांची नियुक्ती झाल्यानंतर तिथे जमीन खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरू होईल. आता काश्मीरमध्ये बाहेरच्या व्यक्ती गुंतवणूक करतील, त्याचबरोबर बाजारपेठही खुली होईल. या सगळ्यात महाराष्ट्र पर्यटन महामंडळ मागे राहणार नाही. असं जयकुमार रावल म्हणाले.

Article 370 : काश्मीरच्या सुंदर खोऱ्यात घर घ्यायचंय? एका प्लॉटची ही आहे किंमत

महाराष्ट्रात MTDC ची अनेक रिसॉर्ट आहेत पण महाराष्ट्राच्या बाहेर मात्र ही रिसॉर्ट नाहीत. काश्मीरसोबतच इतर राज्यांतही रिसॉर्ट उघडण्याचा MTDC चा विचार आहे.

सरकारने काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर तिथे रिसॉर्ट उघडण्याची घोषणा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. काश्मीर आणि लडाखमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांसाठी आता वेगवेगळ्या प्रकारची रिसॉर्ट तयार होतील.

श्रीनगर, पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग अशा ठिकाणी जमीन खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. त्यामुळे आता काश्मीरचा नजाराच बदलणार आहे.

रिअल इस्टेट तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत श्रीनगरमध्ये घरांची मागणी वाढते आहे. इथे घर, प्लॉट, व्हिला, फार्म हाऊस यासोबतच व्यावसायिक कारणांसाठी गाळे घेण्यासाठी रीघ लागली आहे.

=================================================================================================

VIDEO: पुरामुळे छतावर आली मगर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 04:23 PM IST

ताज्या बातम्या