केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी मोठी घोषणा केली. यात महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची सुरुवात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ही लहान बचत प्रमाणपत्र योजना आहे ज्यामध्ये महिलांसह लहान मुलींनासुद्धा गुंतवणूक करून आत्मनिर्भर बनवू शकते.
देशात मोठ्या संख्येने महिला फिक्स्ड डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. जर तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि एफडी पैकी एका योजनेत गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर दोन्ही योजनांबद्दल आम्ही खास माहिती तुम्हाला सांगणार आहे.
आता एटीएममधून नोटा नाही तर नाणी येणार! 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा
महिलांसाठी तयार केलेल्या या योजनेत दोन वर्षांसाठी जास्ती जास्त २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यावर ७.५ टक्के वार्षिक व्याज मिळते. या योजनेतून NSC, PPF, SSY यांसारख्या योजनांपेक्षा जास्त रिटर्न ग्राहकांना मिळतो. तसंच गुंतवणूक केल्यास आयकर कलम ८०सी अंतर्गत दीड लाख रुपयांची सूट मिळते. याशिवाय काही रक्कम काढण्याची सुविधाही दिली आहे. तुम्ही या योजनेंतर्गत १ एप्रिलपासून कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. या खात्याचे वर्ष मार्च २०२३ ते एप्रिल २०२४ असे असेल.
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयकडून सामान्य नागरिकांना ७ दिवसांपासून २ वर्षांपर्यंत एफडीवर ३ टक्के ते ६.७५ टक्के व्याज देते. त्यानुसार स्टेट बँकेचा व्याजदर महिला सन्मान बचत प्रमाणपत्राच्या व्याजदरापेक्षा ०.७५ टक्क्यांनी कमी आहे. एफडी खाते स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत उघडता येते.
रेपो रेट वाढला तरी EMI चे ओझे कमी हवेय? ही ट्रिक ठरेल फायदेशीर
एसबीआय शिवाय एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक त्यांच्या ग्राहकांना २ वर्षांपर्यंत एफडीवर ३ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत व्याज देते. या सर्व बँकांच्या तुलनेत महिला सन्मान सेव्हिंग खात्यावर मिळणारं व्याज जास्त आहे. जर तुम्ही बँकेत २ लाख रुपयांपर्यंत एफडी करण्याच्या विचारात असाल तर MSSCमध्ये गुंतवणूक करणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.