देशावर वाढतोय कर्जाचा डोंगर; एकूण रक्कम 101.3 लाख कोटींपर्यंत पोहोचली

देशावर वाढतोय कर्जाचा डोंगर; एकूण रक्कम 101.3 लाख कोटींपर्यंत पोहोचली

ही रक्कम जून 2020 पर्यंतची आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर :  केंद्र सरकारवरील कर्ज (Government of India Libalities) जून 2020 च्या शेवटपर्यंत वाढून 101.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. सार्वजनिक कर्जावर (Debt) जारी नवीनतम रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी म्हणजेच  जून 2019 च्या शेवटपर्यंत सरकारचं एकूण कर्ज 88.18 लाख कोटी रुपये इतकं होतं.

सार्वजनिक कर्ज प्रबंधनाने शुक्रवारी जारी केलेल्या तीन महिन्याच्या रिपोर्टनुसार 2020 च्या जून महिन्याच्या शेवटपर्यंत सरकारच्या एकूण सार्वजनिक कर्जाचा भाग 91.1 टक्के होता.

एकूण कर्ज वाढून 101.3 लाख कोटी रुपये

बिजनेस स्टँडर्डमध्ये आलेल्या बातमीनुसार अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry Report) एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार जून 2020 च्या शेवटपर्यंत सरकारचं कर्ज वाढून 101.3 लाख कोटी रुपये झालं आहे. मार्च 2020 पर्यंत हे कर्ज 94.6 लाख कोटी रुपये होतं. जे कोरोनामुळे सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी जून 2020 मध्ये हे कर्ज 88.18 लाख कोटी रुपये होतं.  रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, केंद्र सरकारने चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यादरम्यान 3,46,000 कोटी रुपये तारखेच्या सिक्युरिटीज जारी केली. मात्र एक वर्षांपूर्वी या अवधीत 221000 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज जारी करण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा-सावधान! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या काय घ्याल खबरदारी

कोरोनामुळे जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान झालं आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्यास 5 वर्षांचा कालावधी लागू शकेल. जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट (Carmen Reinhart) यांनी गुरुवारी अशी माहिती दिली. स्पेनची राजधानी मॅड्रिड याठिकाणी झालेल्या परिषदेत रेनहार्ट यांनी हे वक्तव्य केले. यादरम्यान ते म्हणाले की जवळपास 20 वर्षांत ही पहिली वेळ असेल जेव्हा गरिबीचे प्रमाण जागतिक स्तरावर वाढेल.

Published by: Meenal Gangurde
First published: September 20, 2020, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading