• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Motilal Oswal ची 'या' शेअरमध्ये गुंतवणुकीची शिफारस, यावर्षी आतापर्यंत 124 टक्के रिटर्न्स

Motilal Oswal ची 'या' शेअरमध्ये गुंतवणुकीची शिफारस, यावर्षी आतापर्यंत 124 टक्के रिटर्न्स

मोतीलाल ओसवाल रिसर्च फर्मने म्हटलं की, VRL Logistics उच्च मार्जिन LTL व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे आणि नवीन बाजारपेठांमध्ये त्याचे नेटवर्क विस्तारत आहे. मोतीलाल ओसवाल यांनी 540 रुपयांच्या टार्गेटसह स्टॉकला BUY रेटिंग दिले आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : VRL Logistics चे शेअर्स 2021 चे मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. यावर्षी आतापर्यंत या स्टॉकमध्ये 124 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशांतर्गत ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांना या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज हाऊसला विश्वास आहे की VRL Logistics शेअरच्या व्हॉल्यूममध्ये आगामी वाढ या लॉजिस्टिक कंपनीच्या कमाईत आणखी वाढ करेल. मोतीलाल ओसवाल रिसर्च फर्मने म्हटलं की, VRL Logistics उच्च मार्जिन LTL व्यवसायावर लक्ष केंद्रित करत आहे आणि नवीन बाजारपेठांमध्ये त्याचे नेटवर्क विस्तारत आहे. मोतीलाल ओसवाल यांनी 540 रुपयांच्या टार्गेटसह स्टॉकला BUY रेटिंग दिले आहे. Indian Army Recruitment 2021: विना परीक्षा लष्कर अधिकारी होऊन देशसेवेचे संधी मोतीलाल ओसवाल म्हणतात की, नवीन शाखा उघडल्यामुळे VRL Logistics ला आर्थिक वर्ष 2021 आणि 2024 दरम्यान वार्षिक महसुलात 19 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेज हाऊसने सांगितले की व्हॉल्यूममध्ये झालेली वाढ आणि कंपनीने खर्च कमी करण्यासाठी उचललेली पावले लक्षात घेता, पुढील दोन वर्षांत VRL Logistics च्या EBITDA मार्जिनमध्ये 14-15 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. Indian Railway चा मोठा निर्णय; आता ट्रेनही भाड्याने घेता येणार, काय आहे योजना? याशिवाय अर्थव्यवस्थेतील तेजी, किमतीत झालेली वाढ आणि इंधनाच्या दरात झालेली घसरण याचाही फायदा कंपनीला मिळणार आहे. मागणी वाढल्याने, कंपनी आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत प्रति तिमाही 100 वाहने जोडण्याची योजना आखत आहे. याशिवाय वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी आपल्या नवीन शाखा देखील उघडत आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या उर्वरित भागात कंपनी आणखी 100 शाखा उघडणार आहे, या सर्वांचा कंपनीला फायदा होईल.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: