मराठी बातम्या /बातम्या /मनी /Motilal Oswal ची शिफारस, 'या' स्टॉकमध्ये 40 टक्के अपसाईडचा अंदाज

Motilal Oswal ची शिफारस, 'या' स्टॉकमध्ये 40 टक्के अपसाईडचा अंदाज

मोतीलाल ओसवाल यांनी zensar Technologies स्टॉकवर 600 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. Zensar विविध क्षेत्रांना डिजिटल प्रोडक्ट्स आणि सर्विस पुरवते.

मोतीलाल ओसवाल यांनी zensar Technologies स्टॉकवर 600 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. Zensar विविध क्षेत्रांना डिजिटल प्रोडक्ट्स आणि सर्विस पुरवते.

मोतीलाल ओसवाल यांनी zensar Technologies स्टॉकवर 600 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. Zensar विविध क्षेत्रांना डिजिटल प्रोडक्ट्स आणि सर्विस पुरवते.

मुंबई, 28 नोव्हेंबर : शेअर बाजारात या आठवड्यातील ट्रेडिंग सेशनमध्ये बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. 26 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 4 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. अशा स्थितीत बाजारातील दिग्गजांचा असा विश्वास आहे की यावेळी अनेक स्टॉक खालच्या पातळीवर उपलब्ध आहेत, ज्यावर बेटिंग फायदेशीर सौदा ठरेल. असाच एक स्टॉक म्हणजे Zensar. मोतीलाल ओसवालच्या मते (Motilal Oswal) या स्टॉकमध्ये लाँग टर्मसाठी 40 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

मोतीलाल ओसवाल यांनी या स्टॉकवर 600 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. Zensar विविध क्षेत्रांना डिजिटल प्रोडक्ट्स आणि सर्विस पुरवते. याशिवाय, कंपनी क्वाऊंड बेस्ड सेवा देखील प्रदान करते. कंपनी डेटा इंजिनीअरिंग आणि अॅनालिस्टिक व्यवसायात देखील आहे.

FY2022 च्या दुसऱ्या तिमाहीत, कंपनीची डॉलर कॉन्स्टंट करन्सी महसूल वाढ तिमाही आधारावर 12.3 टक्के होती, तर ऑरगॅनिक कॉन्स्टंट करन्सी वाढ 6.4 टक्के होती. ती मोतीलाल ओसवाल यांच्या अंदाजापेक्षा जास्त होती.

या मराठी तरुणाला मोदी सरकारकडून मिळाले 90 लाख! PM Modi यांनी केलं कौतुक

वेतनवाढ आणि इतर त सप्लाय-संबंधित समस्यांमुळे कंपनीचे EBITDA मार्जिन दुसर्‍या तिमाहीत तिमाही आधारावर 300 बेसिस पॉईंट्सनी घसरून 10.9 टक्क्यांवर आले आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यातील फरक काय? 22 Karat सोन्याला का म्हणतात 916 Gold

मोतीलाल ओसवाल यांना विश्वास आहे की मिडकॅप स्पेसमध्ये Zensar चे मूल्यांकन सर्वात स्वस्त आणि आकर्षक दिसते. हा स्टॉक त्याच्या पीयर्सच्या तुलनेत 45 टक्क्यांच्या सवलतीत उपलब्ध आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत आणि आर्थिक वर्ष 2023 मध्येही कंपनीच्या महसुलात वाढ होण्याची मोतीलाल ओसवाल यांना अपेक्षा आहे. कंपनीच्या नवीन सीईओच्या नेतृत्वाखाली कंपनी प्रगतीच्या मार्गावर असल्याचे दिसते. या शेअर्सचे रीरेटिंग पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल.

(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market