मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोतीलाल ओसवालला JSPL शेअरमध्ये 34 टक्के वाढ अपेक्षित, चेक करा टार्गेट प्राईज

मोतीलाल ओसवालला JSPL शेअरमध्ये 34 टक्के वाढ अपेक्षित, चेक करा टार्गेट प्राईज

Jindal Steel & Power Limited (JSPL) चा शेअर आज 12.20 रुपयांनी म्हणजेच 3.43 टक्क्यांनी वाढला. बाजार बंद झाला त्यावेळी शेअर 369.05 रुपयांवर ट्रेड करत होता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 7 डिसेंबर : शेअर बाजारात आज म्हणजेच 7 डिसेंबर रोजी, मेटल इंडेक्सने (Metal Index) इतर सेक्टर्सपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आणि 2 टक्क्यांहून अधिक वाढ दिसली. ज्यामुळे सकाळच्या सेशनमध्ये जिंदाल स्टील अँड पॉवर (Jindal Steel & Power Limited- JSPL) च्या शेअरची किंमत 2 टक्क्यांहून अधिक वाढली.

Jindal Steel & Power Limited (JSPL) चा शेअर आज 12.20 रुपयांनी म्हणजेच 3.43 टक्क्यांनी वाढला. बाजार बंद झाला त्यावेळी शेअर 369.05 रुपयांवर ट्रेड करत होता.

देशांतर्गत संशोधन आणि ब्रोकिंग फर्म मोतीलाल ओसवालने सध्याच्या किंमतीपेक्षा 34 टक्क्यांनी जास्त टार्गेट या शेअरला दिलं आहे. म्हणजे 478 रुपयांच्या टार्गेटसही खरेदीची शिफारस मोतीलाल ओसवालने दिली आहे.

केंद्र सरकारडून 22.55 कोटीं नागरिकांच्या खात्या पैसे ट्रान्सफर; तुम्हीही चेक करा

मोतीलाल ओसवाल येथील विश्लेषकांनी अलीकडील अहवालात म्हटले आहे की कंपनी तिच्या EBITDA मार्जिनमध्ये स्ट्रक्चरल बदलातून जात आहे. मागील सायकल सरासरीच्या तुलनेत EBITDA मार्जिन प्रति टन 2,000-2,500 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे.

ब्रोकरेजने सांगितले की, स्टील बाजार नजीकच्या काळात कमकुवत राहील. मात्र आधीच लागू केलेल्या प्रक्रियेअंतर्गत लॉन्ग टर्म ग्रोथ प्लान आधीच अंमलात आणला जात आहे तो विचारात घेता, मार्च 2023 पर्यंत कर्ज शून्यावर येईल. मोतीलाल ओसवाल या स्टॉकबाबत सकारात्मक आहे आणि खरेदी कायम ठेवत आहे.

शेअर बाजारात दोन दिवसात गुंतवणूकदारांचे 5.80 लाख कोटी बुडाले

मोतीलाल ओसवालने पुढे म्हटलं, मागणीतील मंदी आणि अपूर्ण प्रकल्पांचे पुनरुज्जीवन यामुळे आम्हाला चौथ्या तिमाहीत किमतीत सुधारणा अपेक्षित आहे. कोविडच्या नव्या वेरिएंटचा प्रसार ही एक प्रमुख चिंतेची बाब आहे, परंतु ओमिक्रॉन वेरिएंटची भीती खप थांबवू शकते.

First published:

Tags: Investment, Money, Share market