मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Stocks to Buy: शेअर बाजारातील घसरणी दरम्यान 'या' स्टॉक्समध्ये गुंतवणुकीची Motilal Oswal ची शिफारस

Stocks to Buy: शेअर बाजारातील घसरणी दरम्यान 'या' स्टॉक्समध्ये गुंतवणुकीची Motilal Oswal ची शिफारस

Share market मध्ये कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन वेरिएंटचा दबाव आहे. गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये All time high गाठल्यापासून, निफ्टीत आतापर्यंत जवळपास 8 टक्के घसरण झाली आहे. तरीही निफ्टीने या वर्षात आतापर्यंत 21 टक्के परतावा दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 नोव्हेंबर : आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज शेअर बाजाराची सुरुवात कमजोर झाली. मात्र दिवसअखरे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) मुख्य निर्देशांक सेन्सेक्स (SENSEX) 153.43 अंकांच्या किंवा 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 57,260.58 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी (NIFTY) 27.50 अंकांच्या म्हणजेच 0.16 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,054.00 वर बंद झाला.

भारतीय शेअर बाजारात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन वेरिएंटचा दबाव आहे. गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये All time high गाठल्यापासून, निफ्टीत आतापर्यंत जवळपास 8 टक्के घसरण झाली आहे. तरीही निफ्टीने या वर्षात आतापर्यंत 21 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने आपल्या आवडत्या मिडकॅप शेअर्सची यादी जारी केली आहे. या यादीतील शेअर सध्याच्या शेअर बाजारातील घसरणीत खरेदी करता येऊ शकतात.

Motilal Oswal ने शिफारस केलेल्या शेअर्समध्ये SAIL, APL Apollo Tubes, Emami, Ramco Cement, Zensar Tech, Solara Active Pharma, Orient Electric, Angel One, Transport Corp. आणि NOCIL यांचा समावेश आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की बाजारातील सेक्टर्सचे रोटेशन सुरुच राहील आणि Pharma, IT आणि Consumer यांसारख्या क्षेत्रा तेजी दिसू शकते.

Business Idea : Amul सोबत व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

ब्रोकरेजने एका नोटमध्ये म्हटले आहे की, "चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांचे आर्थिक परिणाम देखील चांगले राहिले. बहुतेक कंपन्यांनी आमच्या अंदाजापेक्षा जास्त वाढ केली आहे. विशेषतः Meatl, Oil & Gas आणि सरकारी बँकामध्ये मजबूत वाढ दिसून आली. सध्याच्या घसरणीदरम्यान Private Banks, FMCG, Realty आणि Auto शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली, तर IT आणि Pharma शेअर्सनी त्यांना मागे टाकले.

GST Rules : नवीन व्‍यवसाय सुरू करताय? जीएसटीचे नियम माहिती करून घ्या

ब्रोकरेजने नोटमध्ये म्हटलं की, "कोरोना केसेसमध्ये घट झाल्यामुळे अर्थचक्र सुरु झालं आहे. नवीन वेरिएंटमुळे काही अनिश्चितता आली आहे, परंतु आम्हाला आशा आहे की पुढील काही आठवड्यांत परिस्थिती स्पष्ट होईल. गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात चांगली कामगिरी केली होती, आर्थिक उलाढाली पुन्हा सुरू झाल्यामुळे शेअर बाजारात तेजी दिसत होती.

(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:

Tags: Investment, Money, Share market