Home /News /money /

Motilal Oswal चा 'या' लार्ज कॅप NBFC स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला; काय आहे टार्गेट आणि स्टॉपलॉस

Motilal Oswal चा 'या' लार्ज कॅप NBFC स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला; काय आहे टार्गेट आणि स्टॉपलॉस

मोतीलाल ओसवाल यांनी 24 डिसेंबर 2021 रोजीच्या रिसर्च रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की L&T Finance Holdings ने HSBC AMC सोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत, HSBC AMC L&T इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट (LTIM) मध्ये 100 टक्के स्टेक घेणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 डिसेंबर : ब्रोकरेज हाऊस Motilal Oswal यांचा L&T Finance Holdings वर खरेदीची शिफारस केली आहे. ब्रोकरेज हाऊसने या शेअरला खरेदीचे रेटिंग देत, त्यासाठी 110 रुपयांचे टार्गेट दिले आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 83 रुपयांच्या मार्केट प्राईजवरून 33 टक्क्यांची वाढ सहज दिसून येते आहे. विशेष म्हणजे, L&T Finance Holdings (LTFH) ही एक मोठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. जे देशभरातील ग्राहकांना विविध प्रकारची आर्थिक उत्पादने आणि सेवा प्रदान करते. मोतीलाल ओसवाल यांनी 24 डिसेंबर 2021 रोजीच्या रिसर्च रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की L&T Finance Holdings ने HSBC AMC सोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत, HSBC AMC L&T इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट (LTIM) मध्ये 100 टक्के स्टेक घेणार आहे. L&T गुंतवणूक व्यवस्थापन (LTIM) हे L&T म्युच्युअल फंड (LTMF) चे व्यवस्थापक आहेत. WhatsApp देणार नजीकच्या स्टोअर्स, रेस्टॉरंट्सची माहिती; कसं आहे नवीन फीचर? या कराराअंतर्गत, HSBC मालमत्ता व्यवस्थापन 42.5 कोटी डॉलर म्हणजे अंदाजे 3191 कोटी रुपये गुंतवणुकीसाठी L&T इनवेस्टमेंट मॅनेजमेंटचे 100 टक्के इक्विटी शेअर्स विकत घेईल. L&T फायनान्स होल्डिंग आपली बॅलेन्सशीट मजबूत करण्यासाठी त्याच्या उपकंपन्यांमधील मूल्य अनलॉक करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. म्युच्युअल फंड व्यवसायाची ही विक्री याच धोरणांतर्गत करण्यात आली आहे. दुसरीकडे, HSBC भारतातील आपल्या धोरणात्मक विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे आणि रणनीतीचा एक भाग म्हणून L&T चा म्युच्युअल फंड व्यवसाय विकत घेतला आहे. एक देश एक आपत्कालीन नंबर, मोबाइल नेटवर्कशिवायही या नंबरवर कॉल करून मिळेल मदत मोतीलाल ओसवाल म्हणतात की या करारामुळे L&T फायनान्स होल्डिंगची स्थिती आणखी मजबूत होईल आणि त्याचा व्यवसाय आणि बॅलेन्सशीट आणखी मजबूत होईल. हे लक्षात घेऊन या शेअरला बाय रेटिंग देत 110 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या