पुढच्या वर्षी १० लाख लोकांना मिळणार नोकऱ्या, ८ ते १० टक्के वाढणार पगार

नवीन वर्षात जवळपास १० लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत.

  • Share this:

तंत्रज्ञानातील सततच्या बदलामुळे यावर्षी पारंपरिक नोकऱ्यांची जागा नवीन नोकऱ्यांनी घेतली. तर पगार साधारणपणे ८ ते १० टक्क्यांनी वाढले.

पुढच्या वर्षीच्या नोकऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर तज्ज्ञांच्या मते, नवीन वर्षी १० लाख नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतात. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही पगारात ८ ते १० टक्केच वाढ होईल. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये अधिक पगार वाढ होऊ शकते.

पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमुळे राजकीय अनिश्चितता डोळ्यासमोर ठेवून नियोक्ता २०१९ च्या पहिल्या सहामाहीत फारसे बदल करेल असं वाटत नाही. गेल्या काही वर्षांपासून रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर आहे.

एकीककडे आर्थिक वृद्धी होत असताना पाहिजे तशा नोकऱ्या उपलब्ध होत नव्हत्या. एका संशोधनानुसार भारतात दरवर्षी साधारणपणे १.२ कोटी लोक रोजगाराच्या बाजारात प्रवेश करतात.

तज्ज्ञांच्या मते, २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर आणि जुलै २०१७ मध्ये लागू करण्यात आलेल्या जीएसटीनंतर २०१८ मध्ये भारजीय रोजगार बाजार पुन्हा रुळावर येताना दिसत आहे.

सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या (SHRM) सल्लाविभागाचे प्रमुख निशिथ उपाध्याय यांच्यामते, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रोजगार हा फार मोठा प्रश्न असणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

मानव संसाधन सेवा प्रदान करणाऱ्या रँडस्टॅड इंडिया कंपनीचे प्रमुख पॉल ड्युपुइस यांनी सांगितले की, तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात प्रविण असणाऱ्यांना तसंच ई-कॉमर्स क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 11:51 AM IST

ताज्या बातम्या