Elec-widget

'हा' व्यवसाय करून तुम्ही कमवू शकता दर महिना एक लाख रुपये

'हा' व्यवसाय करून तुम्ही कमवू शकता दर महिना एक लाख रुपये

कुकुटपालन हा व्यवसाय शेतीला पुरक किंवा तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही 1500 कोंबड्या घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर: सध्या अवकाळी पाऊस आणि रोगांमुळे होणारं पिकांचं नुकसान यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मात्र शेतीसोबत कुकुटपालनाचा जोड व्यवसाय तुम्ही करत असाल तर शेतीपेक्षाही अधिक फायदा तुम्हाला मिळू शकतो. बदलत्या हवामानाचा परिणाम हा पिकांवर सातत्यानं होत असतो. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होतं. मात्र सरकारी योजनांचा लाभ घेऊन तुम्ही जोडधंदा सुरू केलात तर तुम्हाला त्यातून फायदा होऊ शकतो. आज असाच एक व्यवसाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जो व्यवसाय तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणूनही करू शकता. ह्या व्यवसायातून तुम्हाला दर महिना 1 लाखांपर्यंत कमाई होऊ शकते. या व्यवसायासाठी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपयांची आवश्यकता आहे. मुद्रा योजनेसारख्या अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊन तुम्ही व्याजही काढू शकता.

छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरु करायचा असल्यास 1500 कोंबड्या विकत घेऊन याची सुरुवात केली तर किमान 50 हजार ते एक लाखांपर्यंत तुम्हाला महिन्याला तुम्ही कमवू शकता.

व्यवसायासाठी लागणारा एकूण खर्च- तुमची स्वत: ची जागा असणं आवश्यक आहे. कोंबड्यांसाठी लागणारा थोडा मोठा पिंजरा आणि इतर साहित्य घेण्यासाठी साधारण 5 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. 1500 कोंबड्यांपासून हा व्यावसाय सुरु केला तर त्यातून फायदा मिळेल. काही वेळा कोंबड्या आजारी पडतात, किंवा रोगामुळे त्यांचा मृत्यू होतो. अशा सर्व गोष्टींचा विचार करून ह्या घेणं आवश्यक आहे.

कोंबड्या खरेदी करण्याचं बजेट- एक लेयर पॅरेंट बर्थची किंमत साधारण 30 ते 35 रुपये असते. साधारण कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 ते 60 हजार रुपयांची आवश्यकता आहे. त्यातही कोंबड्यांची जात आणि त्यासाठी आवश्यक असणारे खाद्य पदार्थ, औषध आणि लसीकरणाचा खर्च याचंही बजेट बसवायला हवं.

Loading...

20 आठवड्यांचा खर्च साधारण 3 ते 4 लाख रुपये येतो. कोंबड्यांच्या खाण्याचा खर्च साधारण या 20 आठवड्यांमध्ये एक ते दीड लाख रुपये होतो. एक लेअर पॅरेंट बर्ड एका वर्षाला साधारण 300 अंडी देतात. 20 आठवड्यांनंतर साधारण या कोंबड्यांवर 3 ते 4 लाख रुपये एकूण खर्च येतो. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही वर्षाकाळी 14 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

साधारण विचार केला तर 1500 कोंबड्यांपासून प्रत्येकी 290 अंडी प्रतिवर्षाला मिळाली तर 4 लाख अंडी तुम्ही विकू शकता. एका अंड्याची किंमत 3.5 रुपये असा विचार केला तर फक्त अंडी विकून तुम्ही 14 लाखांपर्यंत कमाई करू शकता.

या व्यवसायासाठी फॉर्मल ट्रेनिंग आवश्यक- या व्यवसायातून नफा जरी चांगला मिळत असला तरीही हा व्यवसाय उभा कसा करायचा याबाबत ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. कोंबड्यांना कसं किती खायला द्यावं, त्यांना कसं हाताळलं पाहिजे, त्यांची काळजी काय आणि कशी घ्यायला हवी याची माहिती घेणं आणि ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. तरच तुम्ही उत्तम व्यवसाय करून अधिक नफा कमवू शकता. व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा व्यवसाय तुम्ही शेतीला जोड किंवा पूरक व्यवसाय म्हणून निवडू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2019 08:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com