मराठी बातम्या /बातम्या /मनी /

7th Pay Commission: आई-वडिलांच्या निधनानंतर मुलांना महिन्याला 1.25 लाख पेन्शन, जाणून घ्या नवे नियम

7th Pay Commission: आई-वडिलांच्या निधनानंतर मुलांना महिन्याला 1.25 लाख पेन्शन, जाणून घ्या नवे नियम

सातव्या वेतन आयोगानंतर (7th Pay Commission) सरकारी नोकरीमधील पगार 2.5 लाख रुपये महिना करण्यात आला. यानंतर मुलांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही (Pension) बदल झाले.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 31 मे : पती आणि पत्नी दोघंही केंद्र सरकारचे कर्मचारी (Central Government Employee) असतील आणि Central Civil Services (CCS-पेन्शन) 1972 नियमांनुसार त्यांच्याकडे कव्हर असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर मुलांना दोन फॅमिली पेन्शन मिळू शकतात. याची कमाल सीमा 1.25 लाख रुपये इतकी आहे. मात्र, यासाठीही काही नियम आणि अटी आहेत. या अटी मान्य केल्यासच तुम्हाला ही पेन्शन मिळू शकते. हेही वाचा -  SBI Alert! कॅश काढण्याच्या नियमांत बदल, एका दिवसांत काढता येणार इतकी रक्कम केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठीही अनेक सुविधा देतं. Financial Express मध्ये आलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय सिव्हिल सर्विस 1972च्या नियम 1972च्या सब रूल (11) अंतर्गत पती आणि पत्नी दोघंही सरकारी कर्मचारी असतील आणि या नियमांमध्ये बसत असतील तर त्यांच्या मुलांना हे पेन्शन घेता येईल. नियमांनुसार, या दोघांमधील एकाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पेन्शन जोडीदाराला मिळेल. तर, दोघांचाही मृत्यू झाल्यास पेन्शन त्यांच्या मुलांना मिळेल. हेही वाचा - EPFO चा नवा नियम, अटी पूर्ण न केल्यास PF अकाउंट होल्डरला बसेल मोठा फटका याआधी आई आणि वडील दोघांचाही मृत्यू झाल्यास रूल 54 च्या सब रूल (3) नुसार मुलांना मिळणाऱ्या पेन्शनची सीमा 45,000 इतकी होती. सातव्या वेतन आयोगानंतर सरकारी नोकरीमधी पगार 2.5 लाख रुपये महिना करण्यात आला. यानंतर मुलांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही बदल झाले. Department of Pension & Pensioners Welfare (DoPPW) च्या नोटिफिकेशननुसार, दोन सीमांमध्ये बदल करुन हे 1.25 लाख रुपये आणि 75,000 रुपये प्रतिमहिना करण्यात आलं आहे.
First published:

Tags: Pension, Pension scheme

पुढील बातम्या