Home /News /money /

अर्थविषयक बातम्यांसाठी विस्तारित व्यासपीठ; Moneycontro Pro चा Financial Times बरोबर करार

अर्थविषयक बातम्यांसाठी विस्तारित व्यासपीठ; Moneycontro Pro चा Financial Times बरोबर करार

Financial Times वरचा सर्वोत्तम मजकूर आता moneycontro Pro च्या सबस्क्रायबर्सना उपलब्ध होणार आहे.

    मुंबई, 19 ऑक्टोबर : अर्थविषयक बातम्यांचं भारतातलं वेगाने विस्तारणारं सबस्क्रिप्शन पोर्टल Moneycontrol Pro आता एका सहकार्याबरोबरच्या भागीदारीमुळे अधिक परिपूर्ण होणार आहे. मनीकंट्रोल प्रो ने Financial Times बरोबर करार केला असून आता मनीकंट्रोल प्रोच्या सबस्क्रायबर्सना Financial Times चं सविस्तर आणि सखोल वृत्तांकनही वाचता येणार आहे. अर्थजगात Financial Times चं स्थान मोठं आहे. जगतविख्यात तज्ज्ञ आणि पत्रकारांनी केलेलं विश्लेषण, भाष्य आणि अचून माहिती ही The Financial Times ची वैशिष्ट्य आहेत. आता हाच कंटेण्ट मनीकंट्रोलच्या वाचकांसाठी खुला होणार आहे. मनी कंट्रोल आणि फायनान्शिअल टाइम्स यांच्या एकत्र येण्यामुळे यूजर्सना अर्थविषयक माहिती आणि ज्ञान अधिक नेमकेपणाने मिळेल. मनी कंट्रोल प्रो च्या यूजर्सना त्यांचे गुंतवणूकविषयक किंवा अर्थविषयक निर्णय घ्यायला, जागतिक बाजारपेठ समजून घ्यायला आता आणखी सुलभ जाईल. या दोन मोठ्या अर्थवृत्त संस्थांच्या एकत्र येण्यामुळे इक्विटी अनालिसीस, तज्ज्ञांचा सल्ला, मार्केट इनसाइट्स, गुंतवणूकीचा ओघ, शेअर बाजापाचा कल, सल्ला, गुंतवणूकीच्या नव्या कल्पना याचं एक परिपूर्ण दालन वाचकांसाठी खुलं होईल Moneycontrol Pro अद्याप न वापरलेल्यांनाही हे सबस्क्रिप्शन करता येईल. तातडीने सबस्क्राइब करणाऱ्यांना फिनान्शिअल टाइम्सचा कंटेटही मिळणार आहे. एक वर्षाचं सबस्क्रिप्शन फक्त 399 रुपयात मिळवण्याची संधी पहिल्या वर्षी मिळणार आहे. मनी कंट्रोलचे बिझनेस हेड (B2C revenues)मनोज नागपाल म्हणाले, "आमच्या स्टेकहोल्डर्सना सातत्याने परिपूर्ण कंटेट द्यायचा आणि सतत नव्या सेवा द्यायचा मनीकंट्रोल प्रोचा प्रयत्न आहे. फिनान्शिअल टाइम्सबरोबरचा नवा करार आमच्या समान उद्देशाचं फलित आहे. प्रो यूजर्सना जागतिक बाजारासंबंधी योग्य ते खरेखुरे विश्लेषण देण्याचा आमचा उद्देश आहे." फिनान्शिअल टाइम्सच्या अँजेला मॅके म्हणाल्या, "अर्थविषयत आणि व्यापारविषयक बातम्या पुरवण्यासाठी मनीकंट्रोल प्रोबरोबर होणार्या कराराचा आम्हाला आनंद आहे. " एप्रिल 2019 मध्ये मनीकंट्रोल प्रो या पोर्टलला सुरुवात झाली. आतापर्यंत याचे 300,000 हून अधिक सबस्क्रायबर्स झाले आहेत. अर्थव्यवस्था, व्यापार, बिझनेस, बाजारपेठ, धोरण आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने विश्लेषणात्मक माहिती आणि दृष्टिकोन द्यायचा आमच्या संपादकांचा प्रयत्न असतो. Moneycontrol Pro हा network18 चा भाग आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या