Home /News /money /

जगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश

जगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज प्रोव्हायडर्समध्ये Moneycontrol Pro चा समावेश

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ पीरिओडिकल पब्लिशर्सच्या अहवालानुसार, मनीकंट्रोल प्रो या यादीमध्ये असणारं एकमेव भारतीय आणि आशियातील तिसऱ्या क्रमांकाचं डिजिटल न्यूज प्रोव्हायडर आहे.

नवी दिल्ली, 17 जून: मनीकंट्रोलच्या 'मनीकंट्रोल प्रो' (Moneycontrol Pro) या प्रीमिअम (Premium) सेवेचा समावेश जगातल्या टॉप 20 डिजिटल न्यूज सबस्क्रिप्शन प्रोव्हायडर्समध्ये (Digital News Subscription Provider) झाला आहे. 'मनीकंट्रोल प्रो'चे 3 लाख 30 हजार सबस्क्रायबर्स असून, या सेवेचा आशियात तिसरा क्रमांक लागतो, असं इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ पीरिऑडिकल पब्लिशर्सच्या अहवालात म्हटलं आहे. मनीकंट्रोल प्रोने केवळ दोन वर्षांतच वाचकांच्या प्रेमाच्या बळावर हे यश मिळवलं असून, त्याबद्दल मनीकंट्रोल प्रोकडून वाचकांचे आभार मानण्यात आले आहेत. मनीकंट्रोल प्रो हा गुंतवणूकदारांसाठीचा प्लॅटफॉर्म (Investors Platform) आहे. त्यात बातम्यांची भाऊगर्दी टाळली जाते आणि केवळ कृती करण्यायोग्य गुंतवणुकीसंदर्भातल्या बातम्या, उपाययोजना दिल्या जातात. सबस्क्रायबर्सना जाहिरातमुक्त वातावरणात क्युरेटेड मार्केट्स डेटा पुरवला जातो. तसंच एक्स्क्लुझिव्ह ट्रेडिंग रेकमंडेशन्स, इंडिपेंडंट इक्विटी अॅनालिसिस आणि रोखठोक व नेमकी अशी तज्ज्ञांची मतं सबस्क्रायबर्सना पुरवली जातात. त्यामुळे सबस्क्रायबर्सना विषयाचं आकलन चांगल्या पद्धतीने होतं आणि चांगल्या माहितीच्या आधारे ते योग्य निर्णय घेऊ शकतात. हे वाचा-भारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क अन्य कुठेही उपलब्ध असणार नाही, अशा पद्धतीची माहिती, संशोधन मनीकंट्रोल प्रोच्या सबस्क्रायबर्सना पुरवलं जातं. तसंच, इंडस्ट्रीतल्या सर्वांत विश्वासार्ह स्रोतांकडून त्याची मांडणी केली जाते. नवीन माहिती देण्याचा प्रयत्न मनीकंट्रोल प्रोने आपल्या सबस्क्रायबर्सना सातत्याने नवनवी माहिती दिली आहे. एडिटोरियल कंटेंटसाठी मनीकंट्रोल प्रोने फायनान्शियल टाइम्ससोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठांबद्दल सबस्क्रायबर्सचं आकलन वाढायला मदत होते. गेल्या वर्षी मनीकंट्रोल प्रोतर्फे दर महिन्याला मनीकंट्रोल प्रो मास्टर्स व्हर्च्युअल (MC Pro Masters Virtual) या नावाने वेबिनार्स (Webinars) आयोजित करण्यात आले. त्यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करून गुंतवणुकीबद्दल चांगले, महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत झाली. सुमारे 25 हजार जणांनी या सेमिनारमध्ये सहभाग घेतला. प्रोने कन्सिस्टंट कंपाउंडर्स शो ही सीरिजही सुरू केली. सौरभ मुखर्जीया यांच्या नेतृत्वाखालच्या या सीरिजमध्ये देशातल्या आघाडीच्या फंड मॅनेजर्सचे इंटरव्ह्यू पाहता आले. पॅनोरमा आणि वीकेंडर या प्रोच्या न्यूजलेटर्सचा अॅव्हरेज ओपन रेट 18 टक्क्यांपर्यंत आहे. मनीकंट्रोल प्रोने ग्राहकांची सोय आणि ग्राहकांचा फायदा यालाच कायम अग्रस्थान दिलं आहे. त्यात युझर इंटरफेसचं रिडिझायनिंग, न्यू पेमेंट सोल्युशन्स, गिव्हअवेज आदींचा त्यात समावेश आहे. सबस्क्रायबर्सच्या निधीचं उत्तम प्रकारे व्यवस्थापन आणि ग्राहकांना एकंदर उत्तम अनुभव देणं हाच या सगळ्यामागचा हेतू आहे. हे वाचा - Explainer: 5G खरंच मानवी शरीराला हानीकारक ठरणार का? काय आहेत तथ्यं? जाणून घ्या मनीकंट्रोल प्रोवर (Moneycontrol Pro) प्रचंड विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही सबस्क्रायबर्सचे खूप आभारी आहोत. आमचं सर्वोत्तम ते अजून यायचं आहे, असंही आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो. तुम्ही अजून मनीकंट्रोल प्रोचे सबस्क्रायबर नसाल, तर सबस्क्राइब (Subscriber) करण्यासाठी येथे क्लिक करा. प्रॉडक्टबद्दलचा फीडबॅक (Feedback) देण्यासाठी, सजेशन्ससाठी येथे क्लिक करा. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणं शक्य नसलं, तरी आम्ही प्रत्येक प्रतिक्रिया नक्की वाचतो, अशी खात्री देतो.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Money

पुढील बातम्या