महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा होतो? मग 'या' टिप्स वापरून करा बचत

महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा होतो? मग 'या' टिप्स वापरून करा बचत

Money saving, investment - नोकरी करणाऱ्या तरुणांपुढे मोठा प्रश्न असतो तो म्हणजे खर्च कसा कमी करायचा, सेव्हिंग कसं करायचं? याच्याच काही टिप्स

  • Share this:

मुंबई, 27 ऑक्टोबर : नोकरी करणाऱ्या तरुणांची एक मोठी समस्या असते. ती म्हणजे महिना संपता संपता पैसेही संपतात. हातात फारसं काही उरत नाही. मग सेव्हिंग कसं करणार, असा प्रश्नही पडलेला असतो. पण याला तरुणांच्या सवयीच कारणीभूत असतात. त्यासाठी तुमच्यात थोडा बदल करायला हवा.

खर्चाकडे लक्ष द्या

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे मेहनत करून मिळतात. मग त्याची किंमत समजून घ्या. तुमच्या खर्चाचा हिशेब ठेवा. यामुळे तुम्ही तुमचं महिन्याचं बजेट तयार करू शकाल. कुठे किती खर्च होतोय, त्याला आळा कसा घालायचा, हे  ठरवता येईल. त्यासाठी कागद-पेन बाळगण्याची गरज नाही. आता याचे बरेच अॅप्लिकेशन्स आलेत. जे तुमच्या खर्चाचा हिशेब ठेवतात. तुम्हाला नको असलेले खर्च तुम्ही बंद करू शकता.

ही आहेत जगातली महागड्या ऑफिसेसची 10 ठिकाणं, भारताचा कितवा नंबर?

अनावश्यक खर्च टाळा

शहरात बाहेर वीकेण्डला हाॅटेलमध्ये जेवणं, मित्र मैत्रिणीबरोबर फिरणं , कॅफे किंवा बारमध्ये जाणं यात बरेच पैसे खर्च होतात. या सवयी कमी करता येऊ शकतात. मोठ्या शहरांत अनेकदा हाॅटेलिंग वगैरे आदत से मजबूर केलं जातं. त्यावर नियंत्रण ठेवलं तर नक्कीच पैसे वाचतील.

सावधान, बँकेत चुकीचा आधार कार्ड नंबर दिलात तर पडेल 'इतका' दंड

ट्रान्सपोर्ट बदला

अनेक जण ऑफिसमध्ये जाताना ऑनलाइन वाहनं निवडतात. ओला, उबरचा पर्याय असतो. यात प्रवास आरामात झाला तरी पैसे खूप खर्च होतात. डिस्काउंटचाही फारसा फायदा होत नाही. उलट तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केलात तर तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.

15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, होईल लाखोंची कमाई

गुंतवणूक करा

तुम्ही SIP Systematic Investment Plan मध्ये गुंतवणूक करा. बचतीचा हा चांगला पर्याय समजला जातो. एसआयपी गुंतवणुकीचे बरेच अॅप्स आहेत. तुम्ही छोट्या रकमेनंही SIP सुरू करू शकता. यात बचत होतेच, पण भविष्यासाठी गुंतवणूक होते.

VIDEO : बिबट्याचा थरार, 12 तासांनी सापळ्यातून केली सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: saving
First Published: Jul 15, 2019 06:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading