SBI मध्ये तुमचं अकाऊंट असेल तरच तुम्ही घेऊ शकता मोफत सुविधांचा लाभ

SBI मध्ये तुमचं अकाऊंट असेल तरच तुम्ही घेऊ शकता मोफत सुविधांचा लाभ

खूशखबर! SBI ग्राहकांना मिळणार मोफत सुविधा, कसा घ्याल लाभ जाणून घ्या सविस्तर.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर: स्टेट बँक ऑफ इंडिया दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी काही सुविधा मोफत तर काही सुविधा अगदी कमी शुल्क आकारून ग्राहकांना देत असते. त्यापैकी बँकेकडून ग्राहकांना कोणत्या मोफत सुविधांचा लाभ घेता येणार आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही जर स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही SBI चे BSBD खात्याअंतर्गत तुम्हाला सुविधा मिळू शकतात. तुमच्या खात्यावर पैसे असणं आवश्यक आहे.

SBIच्या बीएसबीडी खातेधारकांसाठी ह्या सुविधा मोफत मिळणार आहे.

रुपे एटीएम कम डेबिट कार्ड या खात्यावर मोफत देण्यात येणार आहे. याशिवाय खात्यावर कोणतंही वार्षिक शुल्क आकारण्यात येणार नसल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

NEFT आणि RTGS द्वारे केले जाणारे व्यवहार विनाशुल्क असणार आहेत. यासोबतच NEFTची सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे. काही ठरावीक रकमेपर्यंत ही सुविधा मोफत वापरण्याची मुभाही देण्यात आली आहे.

ग्राहकांना महिन्याला चार वेळा त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मुभा देत आहे. चार ट्रान्झाक्शनंतर मात्र पैसे आकारण्यात येतील. तसेच तुमचं खातं बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क बँकेकडून आकारलं जाणार नाही. मात्र एसबीआयमध्ये तुमचे कोणतेही इतर खाते असल्यास या सुविधांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

वाचा-मुस्लीम कुटुंबाने मुलीच्या लग्नाची पत्रिका छापली संस्कृतमध्ये!

केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या चेकवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय तुम्हाला बँकेकडून इतरही काही सुविधा दिल्या जाणार आहेत. फक्त अट एकच आहे तुमचं इतर कोणतंही खातं असून नये. तुमचं दुसरं खातं असेल तर तुम्हाला ते 4 महिन्यांमध्ये बंद करावं लागेल.

आता कार्ड किंवा पैसे न देता करा शॉपिंग, SBI ची ही खास सेवा

तुम्ही दुकानात गेलात आणि तुम्हाला अचानक तुमचं ATM कार्ड घरी ठेवल्याचं आठवलं तर? तुमच्याकडे पुरेशी कॅशही नसेल तर आणखीनच पंचाईत होते. पण आता काळजीचं कारण नाही. SBI (State Bank of India)ने ग्राहकांसाठी एक नवी सेवा सुरू केली आहे.

SBI च्या या सेवेचं नाव आहे, SBI Card Pay. यामध्ये पॉइंट ऑफ सेल्स मशीन्सवर कार्ड न वापरता मोबाइल फोनच्या माध्यमातून बिल देता येतं. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेचा फायदा ग्राहक त्यांच्या मोबाइलवर एक टॅप करून घेऊ शकतात.

कसा कराल याचा वापर?

SBI Card Pay चा वापर करायचा असेल तर कार्डधारकांना त्यांचं कार्ड SBI कार्ड मोबाइल अॅप वर रजिस्टर करावं लागेल.हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ग्राहकांना पेमेंट करणं सोपं जाईल. फोन अनलॉक करून तुमचा मोबाइल पॉइंट ऑफ सेल टर्मिनलच्या जवळ आणला की पेमेंट होऊ शकेल.

वाचा-ऐकावं ते नवलच! कामाच्या व्यापात अंघोळ करायची विसरली अभिनेत्री, ट्विटरवर लिहिलं..

First published: December 22, 2019, 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading