Home /News /money /

अलीकडेच कमाईची सुरुवात केली आहे का? वाचा बचत आणि गुंतवणुकीसाठी BEST TIPS

अलीकडेच कमाईची सुरुवात केली आहे का? वाचा बचत आणि गुंतवणुकीसाठी BEST TIPS

सध्याची पिढी गुंतवणुकीचे विविध प्रकार वापरू लागली आहे. फिजिकल गुंतवणुकीपेक्षा (Physical Investment) त्यांनी डिजिटल (Digital) गुंतवणुकीला अधिक पसंती दिली आहे.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर: सध्याची पिढी अर्थात The Millennial Generation एकप्रकारे चांगली कमाई करत आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तुमचं बजेट ठरवणं कदाचित Cool ठरणार नाही. तुम्ही आताच उड्डाण भरायला सुरुवात केली आहे आणि अशावेळी तुम्हाला हवा तसा जर त्या पैशांचा वापर करता येत नसेल तर त्या कमाईचा उपयोग काय? असं वाटणं सहाजिक आहे, पण बचत आणि गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची आहे. मनीकंट्रोलमध्ये फायनॅन्शिअल प्लॅनर तेजल गांधी (CEO and Founder, Money Matters, India) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या असं लक्षात आलं आहे की ही पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त प्रमाणात बचत करत आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, केवळ बचत महत्त्वाची नाही आहे. आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी या पिढीकडे एक योग्य रोडमॅप असणे गरजेचे आहे. याकरता गुंतवणूक आवश्यक आहे. Millennial पिढीने गेल्या काही वर्षात टेक्नॉलॉजीकल बदल पाहिला आहे. या वर्षात तांत्रिकदृष्ट्या झालेला बदल अधिकाधिक वेगवान होत आहे. ही पिढी फिजिकल इनव्हेस्टमेंटकडून डिजिटलकडे वळली आहे. जाणून घ्या काय आहे या नव्या पिढीसाठी गुंतवणुकीच्या TIPS या अहवालामध्ये गांधी यांनी दिलेल्या काही खास टीप्स आजच्या पिढीसाठी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर अजून गुंतवणूक आणि बचत करण्यास सुरुवात केली नसेल, तर लवकरच तुम्ही हे काम करणं आवश्यक आहे. जाणून घ्या याकरता आवश्यक काही Tips- कंपाउंडिंगः गुंतवणूक करण्याची वेळ येते तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मिळणारा परतावा कंपाऊंड होत आहे की नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.  कंपाउंडिंग तुम्हाला व्याजावर व्याज मिळवण्यास अनुमती देते. याकरता तुम्ही जितका जास्त वेळ द्याल तितका कॉर्पस तयार होईल. (हे वाचा-या राज्यात नोकरी करायची असेल तर सोडावं लागेल सिगरेट आणि तंबाखू, अशी आहे अट) मालमत्ता वाटप (Asset Allocation): विविध कर्ज आणि इक्विटीमध्ये तुम्ही किती जोखीम घेऊ शकता, यानुसार तुमच्या मालमत्तेची रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवा. वेळ आणि उद्दिष्टं: गुंतवणूक करताना  एखाद्याला त्याचे आर्थिक लक्ष्य आणि त्यासाठी लागणारा कालावधी निश्चित करण्याची आवश्यकता असते. यामुळे तुमची सद्यस्थिती आणि तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे चित्र स्पष्ट होतं. कर्जाचं व्यवस्थापन करा: महागड्या आणि गरज नसणाऱ्या गोष्टींवर पैशाची उधळपट्टी टाळण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित असणे आवश्यक आहे. निवृत्तीसाठी करा बचत: तुम्हाला तुमचा पहिला पगार मिळाल्यापासूनच रिटायरमेंटसाठी गुंकवणूक करा. इक्विटीसारख्या दीर्घ मुदतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करा, जे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी चांगलं उत्पन्न मिळवून देतील. तुमच्या सध्याच्या जीवनशैलीनुसार, आपल्याला आवश्यक असलेल्या सेवानिवृत्ती कॉर्पसची गणना करा आणि त्यानुसार बचत करण्यास सुरुवात करा. (हे वाचा-Post Office च्या या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुप्पट रिटर्न! वाचा सविस्तर) महागाई: गेल्या काही वर्षांमध्ये गरजा तर वाढतच आहेत पण त्याचबरोबर महागाईही वाढते आहे. ऑगस्ट 2020 मध्ये महागाई 6.93 टक्क्यांवर होती. तुमच्या गुंतवणुकीने महागाईवर विजय मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा, महागाईमध्ये तुमची सर्व  बचत संपून जाईल. आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार रहा: आपात्कालीन निधी असणे किती महत्वाचे आहे याची जाणीव कोव्हिड 19 (COVID-19) काळात सर्वांना झाली. संपूर्ण अर्थव्यवस्था थांबल्यासारखी परिस्थिती प्रथमच निर्माण झाली होती. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, नोकरी गमावणे आणि पगार कपात करणे  यासांरख्या आपात्कालीन परिस्थितीसाठी तुम्ही तयार असणं आवश्यक आहे. दुसरे उत्पन्न मिळवाः केवळ नोकरीवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत शोधा. हा एक साइड बिझनेस असू शकतो (जर कायदेशीर परवानगी असेल तर) आर्थिक शिस्त पाळा: भविष्यासाठी संपत्ती निर्माण मिळवताना सुसंगत असणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला गुंतवणुकीसाठी नियमित योगदान करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही मासिक सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) सुरू करुन घर घेण्याचं उद्दिष्टाजवळ पोहोचू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या