तुमची एका पेक्षा जास्त बँके खाती आहेत? होऊ शकतं मोठं नुकसान

तुमची एका पेक्षा जास्त बँके खाती आहेत? होऊ शकतं मोठं नुकसान

तुमची एका पेक्षा जास्त बँकामध्ये खाती असतील आणि त्यावरून व्यवहार करत नसाल तर नुकसान होऊ शकतं.

  • Share this:

एका पेक्षा जास्त बँकेत खातं असेल आणि त्यातील एखाद्या खात्याचा वापर करत नसाल तर ते बंद करा. कारण तुम्हाला खातं चालू ठेवण्यासाठी खात्यावर किमान रक्कम ठेवणं गरजेचं असतं. असं केलं नाही तर तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. खातं बंद करण्यासाठी त्याच्याशी संबंधित सर्व डॉक्युमेंट डी-लिंक करावी लागतात. कारणं बँक खातं गुंतवणूक, कर्ज, ट्रेडिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि विमा यांना जोडलेलं असतं.

सध्या नोकरी बदलली की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सॅलरीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मागणीनुसार बँक खात्याची माहिती द्यावी लागते. त्यामुळे आधीच्या बँक खात्यावर आपले व्यवहार कमी होतात .कोणत्याही सॅलरी खात्यावर तीन महिन्यांपर्यंत सॅलरी आली नाही तर ते खातं सेविंग खातं केलं जातं. त्यानंतर खात्यावर किमान रक्कम ठेवावी लागते. जर तुम्ही रक्कम ठेवली नाहीत तर तुम्हाला दंड केला जातो आणि खात्यातून पैसे कापून घेतले जातात.

अनेक बँकांमध्ये खाते असूनही आयकर भरताना अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हाला प्रत्येक खात्याची माहिती द्यावी लागते. यासोबतच खात्यांचे स्टेटमेंटसुद्दा द्यावं लागतं. खात्यावर व्यवहार न केल्यानं तुम्हाला नुकसान होऊ शकतं.

खातं बंद करण्यासाठी अकाउंट क्लोजर फॉर्म भरावा लागतो. बँकेच्या शाखेत हा फॉर्म मिळतो. फॉर्मवर तुम्हाला खातं बंद करण्याचं कारण विचारलं जातं. त्यानंतर आणखी एक फॉर्म भरावा लागतो ज्यामध्ये तुम्हाला अशा खात्याची माहिती द्यावी लागते ज्यावर बंद होणाऱ्या खात्यातले पैसे ट्रान्सफर करता येतील.

बँकेत खातं उघडल्यापासून 14 दिवसांच्या आत बंद करण्यासाठी कोणतीही आकारणी केली जात नाही. मात्र त्यानंतर एक वर्षापर्यंत खातं बंद करण्यासाठी पैसे आकारले जातात. एक वर्षापेक्षा जुनं खातं असेल तर त्यावर पैसे आकारले जात नाहीत.

बँकेला खातं बंद करण्यापूर्वी तुमच्याकडे न वापरलेलं चेकबुक आणि डेबिट कार्ड असेल तर ते जमा करावं लागतं. तसेच खात्यावर पैसे असतील तर ते दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले जातात. जास्त पैसे असतील तर खातं बंद करण्याची प्रोसेस सुरु करण्याआधी ते दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करा आणि त्याचं स्टेटमेंट तुमच्याकडे ठेवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bank
First Published: Dec 13, 2019 09:47 AM IST

ताज्या बातम्या