ATM मधून पैसे आलेच नाहीत पण खात्यातून गेले तर काय कराल?

ATM मधून पैसे आलेच नाहीत पण खात्यातून गेले तर काय कराल?

ATMमध्ये कार्ड वापरल्यानंतर पैसे आलेच नाहीत किेंवा काहीवेळा अपलोड केलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे आले असं झालं तर काय करावं?

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी: बऱ्याचवेळा आपल्या एटीएममधून पैसे डेबिट होतात पण आपल्या हातात पैसे कमी येतात किंवा काही वेळा पैसे येतच नाहीत. पैसे काढताना अनेकदा अकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज येतो. मात्र एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येतच नाहीत. तेव्हा आपले पैसे बुडाले अशीच भावना मनात येते. तातडीने कस्टमर केअरला फोन लावून डेबिट झालेले पैसे मिळणार का याची चौकशी करतो. बँकही याबाबतीत चौकशी करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागते.

1.काही वेळा एटीएम मशीनमधील तंत्रिक अडचणींमुळेही असा प्रकार घडतो.ज्या बँकचं कार्ड आहे त्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास बँक लगेच त्यावर उत्तर देते. मात्र दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर तुमची बँक त्या बँकेशी बोलणी करते.

2.या सर्व प्रक्रियेसाठी तुम्हाला किमान 7 दिवस वाट पाहावी लागते. 7 दिवसांत उत्तर मिळालं नाही तर तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल करू शकता. तसेच आरबीआयकडेही ज्या बँकेच्या एटीएम मशीनमधून तुम्ही पैसे काढले त्या बँकेची तक्रार करू शकता.

3.सगळ्यात आधी तुम्ही टेन्शन न घेता शांतपणे तुमच्या डेबिट कार्डमागे जो नंबर आहे. त्या कस्टमर केअरवर फोन करा. ज्या एटीएममधून पैसे गेले आहेत. त्याचा नंबर नोट करा. त्या परिसराचं नाव आणि एटीएम नंबर नोट करा आणि सगळ्यात आधी बँकेला फोनवरून माहिती द्या.

4.तुमची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर बँकेकडून तुम्हाला तक्रार दाखल केल्यानंतर एक कोड दिला जाईल. तो कोड तुम्ही बँकेच्या शाखेत दाखवू शकता. हे शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी बँकेच्या शाखेत जाऊन लेखी तक्रार दाखल करा.

5.तुमचे पैसे तुम्हाला 2 आठवड्याच्या आवधीत न मिळल्यास बँकेत पुन्हा एकदा तक्रार दाखल करा. त्यानंतरही काही झालं नाही तर पोलीस आणि RBI कडे तक्रार दाखल करा. एटीएम संबंधीत इतर समस्यांसाठीही तुम्ही बँकेत तक्रार करू शकता. एका महिन्यापर्यंत तुमच्या प्रश्नाचे निरसण झाले नाही तर तुम्ही Banking Ombudsman कडे तक्रार करू शकता.

Published by: Kranti Kanetkar
First published: January 8, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading