मराठी बातम्या /बातम्या /मनी /

जग मंदीच्या उंबरठ्यावर, ‘या’ स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं ठरेल जास्त सुरक्षित

जग मंदीच्या उंबरठ्यावर, ‘या’ स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं ठरेल जास्त सुरक्षित

 जागतिक अर्थव्यवस्था अधिकृतपणे मंदीच्या टप्प्यावर आली आहे. या मंदीत वाचण्यासाठी ही महत्त्वाचे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जागतिक अर्थव्यवस्था अधिकृतपणे मंदीच्या टप्प्यावर आली आहे. या मंदीत वाचण्यासाठी ही महत्त्वाचे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जागतिक अर्थव्यवस्था अधिकृतपणे मंदीच्या टप्प्यावर आली आहे. या मंदीत वाचण्यासाठी ही महत्त्वाचे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 सप्टेंबर :  जागतिक अर्थव्यवस्था अधिकृतपणे मंदीच्या टप्प्यावर आली आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बोर्डाचे सदस्य जेरोम पॉवेल यांनी गुंतवणूकदारांना बेरोजगारी व मंदीसाठी तयार राहण्यास सांगितलंय. 2008 च्या मंदीच्या मार्गाचा अचूक अंदाज वर्तवण्यात आघाडीवर असणारे प्रख्यात अर्थतज्ज्ञ न्युरिएल रूबीनी यांनीही पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत दीर्घकालीन आणि प्रचंड आर्थिक मंदीचा अंदाज वर्तवला आहे.

अनेक अनुभवी बिझनेस एक्झुक्युटिव्ह्जनीही अशाच प्रकारचं मत नोंदवलं आहे. IDC च्या सर्वेक्षणानुसार त्यांच्यापैकी 59% लोकांनी मंदी येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, युरोपमध्ये मंदीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तिथे जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींनी ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

मंदी ही सामान्यतः देशाच्या औद्योगिक आणि व्यापारी प्रकारात आर्थिक घसरणीच्या कालावधीची सूचक असते. एस अँड पीचे प्रमुख जागतिक अर्थशास्त्रज्ञ पॉल ग्रुएनवाल्ड यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक पातळीवरील मंदीपासून भारत पूर्णपणे सुरक्षित नसला तरी तो कदाचित एकटाच या मंदीत तग धरून राहणारा देश ठरू शकतो.

जगभरात बाँड यील्ड्स गगनाला भिडत आहे. जगभरातील विक्रमी चलनवाढीचा सामना करण्यासाठी या वर्षी किमान 90 देशांच्या केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. ते मंदीचं पहिलं लक्षण आहे. उत्पादनांच्या किमती वाढतात, त्यामुळे कंपन्या त्यांचा नफा टिकवून ठेवण्यासाठी खर्च कमी करतात, त्याच्या परिणामी अनेकांची नोकरी जाऊन बेरोजगारी वाढते.

सर्वसामान्यांना मोठा धक्का! पुन्हा लोन महागणार, EMI वाढणार?

मॅक्रोइकॉनॉमिक्स फॅक्टर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अगदी किरकोळ प्रयत्न करू शकत असलो तरीही, क्रॅश लँडिंगमुळे तुमच्या पोर्टफोलिओवर होणारे परिणाम टाळण्याचे काही मार्ग आहेत.

आग्र्यातील फंड वेदाच्या संस्थापक आणि आर्थिक सल्लागार शिफाली सत्संगी म्हणतात की खर्चाचं प्रधान्य ठरवणं आणि खर्चाचं योग्य नियोजन करणं हेच महत्त्वाचं आहे. "कुटुंबाचे आर्थिक गोल ठरवून स्पष्ट व संक्षिप्त पद्धतीने त्याचा चार्ट तयार करा. एकदा तो चार्ट पूर्ण झाल्यावर, त्यानुसार बजेट तयार करा. आकस्मिक निधी आणि आरोग्यासंबंधी आपत्ती आणि जीवन विमा यासाठी पुरेशी तरतूद करणं आवश्यक आहे."

‘अनावश्यक खर्चांत कपात करणं तितकंच महत्त्वाचं आहे,’ असं पुण्यातील फायनान्स प्रोफेशनल नेमा छाया बुच यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘शेअर्सबाबत विचार केलात तर चांगला पीई रेशो असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक तोटा भरून निघण्यास मदत होऊ शकते. ब्लू चीप स्टॉक साधारणत: स्थिर राहतात त्यामुळे त्यातली गुंतवणूक हिताची ठरू शकते. मालमत्तेचे काही प्रकार किंवा सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ती मंदीपासून बचाव करू शकते. निश्चित मिळकतीवर महागाईचा परिणाम होतोच त्यामुळे महागाईनुसार किंमतीत वाढ होणाऱ्या बाँड्समध्ये गुंतवणूक करावी.’

“अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर आल्यावर तुमचा पोर्टफोलिओ नफा देणारा असावा असं वाटत असेल, तर तुमच्याकडे सिलिकल स्टॉक्स असायला हवेत. कारण अर्थव्यवस्था पूर्वपदावर यायला सुरुवात होताच हे स्टॉक्स सर्वांत आधी नफा देतात,” असं त्या म्हणाल्या.

दसरा-दिवाळीच्या गिफ्टवरही लागू शकतो कर! या सोप्या मार्गानं वाचवा टॅक्स

खरं तर लवकर गुंतवणूक सुरू केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्याची आर्थिक क्षमता लक्षात येऊ शकते. एसआयपीच्या माध्यमातून ध्येयाधारित गुंतवणूक केल्याने ते शक्य होईल. प्रत्येक ध्येयासाठी पैसे राखून ठेवले असले तरीही नेहमीच्या करसवलत देणाऱ्या स्कीम्स महागाईच्या तुलनेत समतोल राखता येण्याजोगे रिटर्न्स देतात. अशा पद्धतीने विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तसंच जोखिमींचं संतुलन राखून आपण आर्थिक नियोजन केलं तर कुटुंबासाठी वर्षागणिक चांगल्या मोठ्या निधीची बचत केली जाऊ शकते,' असंही त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Money, Savings and investments