सावधान ! Income Tax रिटर्न भरताना खोट्या भाडेपावत्या देत असाल तर 'असे' याल अडचणीत

सावधान ! Income Tax रिटर्न भरताना खोट्या भाडेपावत्या देत असाल तर 'असे' याल अडचणीत

Income Tax - इन्कम टॅक्स भरताना अनेकदा कर वाचवण्यासाठी खोटी कागदपत्रं दाखवली जातात. पण आता तसे करता येणार नाही

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : इन्कम टॅक्सपासून वाचण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जातात. त्यातलीच एक खोटी कागदपत्रं. अनेकदा इन्कम टॅक्सपासून वाचण्यासाठी खोटी हाऊस रेंटची स्लिप दाखवली जाते. तुम्ही असं करत असाल तर खूप धोकादायक आहे. आता खोट्या भाड्याच्या पावत्या लावल्या तर इन्कम टॅक्स विभाग नोटिस पाठवू शकतं. या अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नवा प्लॅन तयार करतंय.

आयकर विभागानं सांगितलं की, देशात मोठ्या संख्येनं लोक टॅक्स वाचवण्यासाठी  खोट्या घरभाडे पावत्या दाखवतात. यावर निर्बंध घालण्यासाठी लवकरच ठोस पावलं उचलली जाणार आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै.

सावधान! IOC नं केलं सावध, 'ही' चूक केलीत तर होईल लाखोंचं नुकसान

नवा IT फाॅर्म असा झाला डिझाइन     

इन्कम टॅक्सच्या नव्या ITR फाॅर्म आणि फाॅर्म 16 अशा प्रकारे तयार केलाय की खोटी कागदपत्रं जोडली तर कम्प्युटर ती सहज ओळखू शकतो. डेटा जुळला नाही, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटिस मिळेल. त्यामुळे यावेळी प्रत्येकानंच रिटर्न भरताना काळजी घ्यायला हवी.

Loading...

5 महिन्यात सर्वात महाग झालं पेट्रोल, 'हे' आहेत नवे दर

फिस्कल इयर 2018-19साठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2020. तुम्ही या तारखेपर्यंत रिटर्न फाइल करू शकला नाहीत तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटिस मिळू शकते. जरी तुम्ही 31 मार्च 2020पर्यंत रिटर्न फाइल करू शकत असलात तरी तो जुलैमध्येच करावा. तुम्ही 31 जुलै 2019नंतर आणि 31मार्च 2020च्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न भरलात तर तुम्हाला दंड बसू शकतो.

World Cup: सुपर ओव्हरमध्ये दोघांनी समान चौकार मारले असते तर?

तुम्ही 31 जुलैनंतर 31 डिसेंबर 2019पर्यंत IT फाइल केलात तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही 1 जानेवारी 2020पासून 30 मार्च 2020पर्यंत रिटर्न भरलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. इन्कम टॅक्स सेक्शन 234F चा समावेश झाल्यावर लेट फाइन अनिवार्य झालीय. याआधी हे सर्व असेसिंग अधिकाऱ्यांवर अवलंबून असायचं. ते दंड लावतात की नाही ते.

VIDEO: लष्करी अळीमुळे बळीराजा हवालदिल; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 04:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...