Home /News /money /

वर्षाच्या सुरुवातीलाच मिळाली 8 गिफ्ट्स, वाचणार पैसे, बदलेल तुमचं आयुष्य

वर्षाच्या सुरुवातीलाच मिळाली 8 गिफ्ट्स, वाचणार पैसे, बदलेल तुमचं आयुष्य

बँकेपासून आर्थिक व्यवहारांपर्यंत मोठे 8 बदल जाणून घ्या. होईल तुमचा फायदा

    मुंबई, 02 जानेवारी: नव्यावर्षात ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खास गिफ्ट मिळालं आहे. लोन, खात्यासंबंधित नियम आणि एटीएम कार्डसारख्या सुविधांवरील झालेल्या बदलाचा थेट तुमच्यावर परिणाम होणार आहे. यासोबतच आर्थिक व्यवहार आणि इतर नियम बदलल्यानं यंदाचं वर्ष हे ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारं आहे. यंदाच्या वर्षात तुम्हाला मिळालेले सर्वात मोठे 8 गिफ्ट कोणते आहेत जे आपल्या जीवनावर थेट परिणाम करणार आहेत जाणून घ्या. 1. स्टेट बँकेच्या गृहकर्जात मोठा बदल भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. SBI घर खरेदी करणाऱ्यांना नव्या वर्षात स्वस्त गृहकर्ज देत आहे. नव्या वर्षापासूनच 2020 पासून तुम्हाला 0.25 टक्के कमी व्याज द्यावं लागणार आहे. गृहकर्जवरील व्याजदर 7.90 टक्के असणार आहे. 2. ATMमधून पैसे काढण्याची पद्धत बदलली नव्या वर्षापासून फक्त चिपकार्डचा वापर करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नव्या नियमानुसार तुम्हाला जर रात्री 8 ते सकाळी 8 म्हणजेच या 12 तासांत केव्हाही पैसे एटीएमद्वारे काढायचे असतील तर तुमच्या बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पासवर्ड येईल. हा पासवर्ड तुम्ही एकदाच वापरू शकता. हा ओटीपी तुम्हाला टाकून तुमच्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढणाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. 3. ICICI बँकेनं कर्जावरील Interest Rates केला कमी आयसीआयसीआय बँकेनं 0.05 टक्के व्याजदर कमी केल्यानं ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. त्यामुळे 0.5 टक्के पैशांची बचत होणार आहे. या निर्णयामुळे होम आणि ऑटो लोनवरील व्याजदर स्वस्त होणार आहे. जुन्या ग्राहकांसोबतच नव्याने लोन घेणाऱ्यांना हा नियम बुधवारपासून लागू झाल्यानं फायदा होणार आहे. 4. ट्रायकडून मोठं गिफ्ट नव्या वर्षात ट्रायनं ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 130 रुपयांमध्ये तुम्हला 200 चॅनल्स पाहाता येणार आहेत. याआधी ग्राहकांना 130 रुपयांमध्ये केवळ शंभर चॅनल्स पाहण्याची मुभा होती आता ती दुप्पट करण्यात आली आहे. टॅक्सधरून 154 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. या नव्या नियमाची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार आहे. हेही वाचा-सरकारी पेन्शन योजनेत होणार मोठे बदल, करमुक्तीसोबत हेही फायदे 5. रेल्वे प्रवाशांसाठी एका Helpline नंबरवर मिळणार सगळ्या सुविधा प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने (Indian Railway) नवी सुविधा दिली आहे. रेल्वे गाड्यांबाबत किंवा आरक्षणाबाबात काही माहिती हवी असेल प्रवाशांना रेल्वेचा 139 हा Helpline नंबर माहित आहे. त्यामुळे तोच नंबर आता सगळ्याच तक्रारीसाठी असणार असून 139 वर त्याची सोय करण्यात आलीय. रेल्वेचा आता हाच एक Helpline नंबर असणार आहे. इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पाँस सिस्टिम IVRS अशी ही सुविधा राहणार आहे. रेल्वे सुरक्षा, दुर्घटनेची माहिती, तक्रारीसाठी, मेडिकल एमर्जंसी, पीएनआर, कॅटरिंगबाबत तक्रार, भ्रष्टाचाराची तक्रार, कोचच्या सफाईसंदर्भात माहिती देणं अशा 8 प्रकारच्या सुविधा तुम्हाला एकाच हेल्पलाईनवरून वापरता येणार आहेत. 6. NEFT वर ग्राहकांना मोठा दिलासा आता तुम्ही NEFT 24 तास केव्हाही करू शकता. 2 लाख रुपयांपर्यंत त्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. याआधी 10 हजारांपुढे NEFTवर शुल्क आकारलं जात होतं ते आता बंद करण्यात आलं आहे. UPI आणि MDR या सुविधांमध्येही दिलासा मिळणार आहे. कार्डद्वारे पेमेंट केल्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही मात्र याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. 7. 28 नवे आधार सेवा केंद्र नव्या वर्षी भारतात वेगळी ओळख असणाऱ्या आयडेंटीटी कार्ड अर्थात आधार कार्डची 28 नवीन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. बँक, पोस्टासोबतच देशभरात एकूण 38000 आधार नामांकन केंद्र सध्या आहेत. ही 28 आधार सेवा केंद्र सातही दिवस सुरू राहणार आहेत. त्यामुळे आधार संबंधित बदल अथवा नव्या कार्डसाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत 3 लाखहून अधिक लोकांनी या सेवा केंद्रांचा लाभ घेतला आहे. 8. 12 राज्यांमध्ये एक कार्ड एक राशन योजना एक कार्ड एक राशन योजना 12 राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश, तेलंगाना, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरल, मध्यप्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. राशन दुकानावरून दारिद्र रेशेखाली असणाऱ्या नागरिकांना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. हेही वाचा-खूशखबर! सलग दुसऱ्या महिन्यात GST ची वसुली गेली 1 कोटींवर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Aadhar card, Adhar link, ICICI bank, Money, Sbi ATM, SBI bank

    पुढील बातम्या